ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 16 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे ) येथील माध्यमिक विद्यालयात देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण गावातील प्रगतिशील शेतकरी शांताराम सुखदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .
या कार्यक्रमास गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थ हजर होते. गावातील ग्रामपंचायत समोर महाराष्ट्राची लोकधारा लेझीम विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सादर केली. गावातील लोकांनी मुलांचे तोंड भरून कौतुक केले. तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचेचे भव्य प्रदर्शन सादर करण्यात आले. स्वातंत्र्य दिन एक वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
आपल्या परिसरातील टाकाऊ वस्तूंचा कसा वापर करून टिकाऊ वस्तू कशा तयार कराव्या हा संदेश यावेळी देण्यात आला. यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा त्या मागचा हेतू होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले. तर आभार गुलाब पाटील यांनी मानले.
हेही वाचा : Video : नार-पारचा मुद्दा, मंत्री गुलाबराव पाटील आक्रमक; उपमुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्ठीकरण, नेमकं काय घडलं?