पुणे, 25 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला गेल्यानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, दहावीच्या निकालाची तारीख समोर आली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून 27 मे रोजी हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर –
बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केल्यानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकालाबाबत विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागली होती. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल सोमवार, 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
याठिकाणी पाहता येईल निकाल –
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर पाहता येणार आहे. याशिवाय निकाल पाहण्यासाठी आणखी काही वेबसाईट उपलब्ध असून त्यांना त्यावर निकाल पाहता येईल. तसेच डिजीलॉकरद्वारे देखील विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतात. दहावीच्या निकालासाठी असलेल्या वेबसाईटवर 27 मे रोजी दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागांमार्फत आयोजन केले जाते. या विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून आता 27 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली आहे.
हेही वाचा : तलाठी वर्षा काकुस्ते यांनी 25 हजार रूपयांची लाच स्विकारल्याने गुन्हा दाखल, पारोळा तालुक्यात नेमकं काय घडलं?