पाचोरा (जळगाव), 5 जुलै : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून गेल्या तब्बल 29 वर्षापासून प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव हरेश्वर येथे पायी दिंडीची परंपरा आजही कायम आहे. विशेष म्हणजे या दिंडीमध्ये वयोवृद्ध वारकऱ्यांचाही सहभाग दिसून येतो.
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून पायी दिंडी ही प्रति पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर येथे जात असते. या पायी दिंडीचा मुक्काम ठिकठिकाणी गावांमध्ये असतो. ही पायी दिंडी तब्बल 29 वर्षापासून आजही अखंडितपणे सुरू आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षीही नगरदेवळा येथून ही पायी दिंडी वारकऱ्यांसह पहिला मुक्काम असलेल्या खडकदेवळा खुर्द येथे दाखल झाली. हीच ही पायी दिंडी गेल्या 29 वर्षापासून खडकदेवळा खुर्द गावातील शेतकरी कृष्णा मोरे यांच्या यांच्याकडे मुक्कामी आहे.
या ठिकाणी पायी दिंडी येणाऱ्या वारकऱ्यांची संपूर्ण देखरेख सह भोजनाची व्यवस्था नित्य नियमाने करतात. दुसऱ्या दिवशी देखील सर्व वारकऱ्यांना भक्तिमय वातावरणामध्ये अन्नदान करून ते पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करतात या कामांमध्ये कृष्णा मोरे यांचा पूर्ण परिवार या भाविकांची सेवा गेल्या तब्बल 29 वर्षांपासून अखंडितपणे करीत आहेत.
विशेष म्हणजे या पायी दिंडी मध्ये वयोवृद्ध वारकरी देखील मोठ्या भक्ती भावाने सहभागी होतात. वयोवृद्ध वारकरी यावेळी सांगतात की आम्हाला पंढरपूरला जाणे शक्य नाही. परंतु प्रति पंढरपूर असलेल्या पिंपळगाव हरेश्वर येथे जाऊन आमचं विठुरायाचे दर्शन नित्यनियमाने होत आहे. खडकदेवळा खुर्द येथील कृष्णा मोरे यांचा परिवार तब्बल 29 वर्षांपासून पायी दिंडी जाणाऱ्या वारकऱ्यांचा सेवार्थ आजही सुरू आहे.