ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 16 ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण असून पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील आश्रमशाळेत 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक व शालेय समितीचे प्रमुख प्रा. भागवत महालपूरे होते आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीतानंतर “भारत माता की जय” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या या सोहळ्याला आश्रमशाळेचे मुख्याध्यापक डी. आर. पाटील, मुख्याध्यापक खाटिक, सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, अधीक्षक- अधिक्षिका, वसतिगृह कर्मचारी, विद्यार्थी, भारतीय सैनिक, ग्रामस्थ, आजी-माजी मुख्याध्यापक, पोलिस पाटील, महसूल सेवक कोतवाल, आरोग्य विभाग कर्मचारी, पत्रकार बांधव,विद्यार्थी पालकवर्ग तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
View this post on Instagram
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे मनःपूर्वक कौतुक करत, देशसेवेच्या प्रेरणादायी भावना जोपासण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन आकाश महालपूरे तसेच किरण तडवी यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर, विद्यार्थी आणि पालक यांनी एकत्र येऊन भोजनाचा आस्वाद घेतला.