मुंबई, 25 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आणि वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी एक्स प्लॅटफॉर्म एक्सवर एक भावनिक पोस्ट केली.
झिशान सिद्दीकीची बाबा सिद्दीकींबद्दल शेअर केली भावूक पोस्ट –
पाच वर्षांपूर्वी याच दिवशी बाबा सिद्दीकीसोबतचा एक फोटो शेअर करत झिशान म्हणाला होता की, “तुमच्या मेहनतीमुळे आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे क्षण शक्य झाले ते या फोटोत कैद झाले होते, बाबा, मला रोज तुमची आठवण येते.”
बाबा सिद्दिकी गोळीबारात यांचा मृत्यू –
झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना 25 ऑक्टोबर रोजी घडली. या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. हिंदी भाषेत मजकूर टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केली आहे, असे बाबा सिद्दिकी यांचे नाव घेऊन सांगितले आहे. दरम्यान, दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीत पोस्टमध्ये करण्यात आला होता. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
हेही वाचा : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी ‘हे’ पुरावे ग्राह्य धरले जाणार