जालना – सध्या सोशल मीडियाच्या जमाना आहेत. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर मैत्री केल्यानंतर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
इन्स्टाग्रामवर एका तरुणाने 17 वर्षांच्या मुलीने मैत्री केली. मैत्री करुन तिला ब्लॅकमेल केले. तरुणाच्या या जाचामुळे नैराश्यात गेलेल्या या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. जालना जिल्ह्यातील जिल्ह्यातील अंबड येथे ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मृत मुलगी ही अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तसेच अंबड शहरातील शारदानगर भागातील रहिवासी होती. या मुलीसोबत आरोपीने इन्स्टाग्रामवर ओळख केली. तसेच तिच्याशी मैत्री केली. यानंतर त्याने ब्लॅकमेलिंग करून धमकावल्याने आज सकाळच्या सुमारास या मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
इन्स्टाग्रामवरील तरुणाकडून मृत मुलीला धमक्याही दिल्या जात होत्या. मृत मुलीने याआधी आरोपीविरोधात याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, आज शेवटी तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी एका सोहम मिंधर नावाच्या आरोपी तरुणास अटक केली आहे. तसेच या प्रकरणी इतर आरोपी असल्याचा संशय असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाप्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. त्यातच आता आणखी एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त आहे. सोशल मीडियाचा वापर करताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.