छत्रपती संभाजीनगर – महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. यावर भुजबळ हे अजित दादांसोबत राहतील की नाही राहतील, असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेला आहे, हे सत्य आहे. आता कधी काय होईल, याचा भरवशा थोडी देता येतो, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर यानंतर भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटानेही धक्कातंत्र वापरले. यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांना राज्य मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. भुजबळांना वगळण्यात आल्यानंतर मात्र, त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. लवकरच छगन भुजबळ हे भाजपमध्ये जातील आणि भाजपच्या कोट्यातून त्यांना मंत्रीपद मिळेल, अशीही चर्चा होत आहे. यावर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
Mla Anup Agrawal: ‘वक्फ बोर्ड भारतासाठी धोकादायक’, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल Exclusive मुलाखत
काय म्हणाले अंबादास दानवे –
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काहीही होऊ शकतं. आता कधी काय होईल, याचा भरवशा थोडी देता येतो. परंतु ज्या पद्धतीने भुजबळ व्यक्त होत आहेत, त्यापद्धतीने बघितले तर भुजबळ हे अजित दादांसोबत राहतील की नाही राहतील, असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेला आहे, हे सत्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचे मंत्रीपद जाऊन ते मंत्रीपद भुजबळांना मिळू शकतं, या बाबतच्या चर्चांवर अंबादास दानवे म्हणाले की, मला असं वाटतं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र, बीडच्या घटनेतील मुख्य आरोपी अजूनही सरकारला सापडत नाही. आणि आरोपीची कुणीशी कनेक्टिव्हिटी आहे, हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. अद्यापही सरकार यावर गतीने किंवा गांभीर्याने पाऊले उचलत नाही, हेसुद्धा सत्य आहे.
jaykumar rawal : मंत्री जयकुमार रावल यांच्या सुवर्ण खान्देश लाईव्हला शुभेच्छा, Exclusive मुलाखत
सर्वांना विनंती – कृपया आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे.
यूट्यूब चॅनेलची लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos