पाचोरा, 8 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील गाळण येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय स्काऊट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गाच्या सानिध्यात शेतात या एकदिवसीय स्काऊट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आधी पाचोरा तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून एकदिवसीय शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वैशाली सूर्यवंशी आपल्या मनोगतामध्ये काय म्हणाल्या –
वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, स्काऊटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास चांगल्याप्रकारे साधता येतो. तसेच शारीरिक व मानसिक विकासासाठी स्काऊट वेगवेगळे उपक्रम राबवित असते. यावेळी त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला.
याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष बाबुलाल हरी राठोड, प्राचार्या शोभा शिंदे, शिबिराचे आयोजक आर. एल. पाटील, सुनील शिवाजी सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, तालुकाध्यक्ष शरद पाटील, शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेशचंद्रजी बाफना, सेनेच्या उपजिल्हा संघटिका तिलोत्तमा मौर्य, तालुका सेना समन्वयक ज्ञानेश्वर पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, नाना वाघ, डी. डी. पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाल्मिक पाटील यांनी केले. तर आभार आर. एल. पाटील यांनी मानले.