ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 2 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील मूकबधिर निवासी विद्यालयातील मूकबधीर मुलांसोबत पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या पत्नी राजश्रीताई येरुळे यांचा वाढदिवस आज दुपारी साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त धनंजय येरुळे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन दिले.
पाचोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कार्यरत असलेले धनंजय येरूळे यांच्या पत्नी राजश्री येरुळे यांचा आज 51 वा वाढदिवस होता. यानिमित्त पिंपळगाव (हरे.) येथील मूकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजश्रीताई येरुळे यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. दरम्यान, या विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
यावेळी डीवायएसपी धनंजय येरुळे, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी पी. बी. पाटील, सपोनि सर्जेराव क्षीरसागर, पोलीस कर्मचारी राहुल बेहरे, सागर पाटील, ऋषिकेश सोनवणे,अजयसिंग राजपूत,अमोल पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते अण्णा बेलदार, पाचोरा वकील संघाच्या उपाध्यक्षा कविता रायसाकडा, पत्रकार किशोर रायसाकडा, अनिल येवले, राजेंद्र खैरनार, भिकन पाटील, दिपक मुलमुले, चंद्रकांत मोहोर ईश्वर पाटील, प्रतिभा वाघ, गोविंद महाजन, प्रवीण सूर्यवंशी, प्रताप इंगळे, अमोल महाजन, संदेशाह, ज्ञानेश्वर चौधरी, नितीन पाटील, महेंद्र घोंगडे, मधुकर ठाकूर, शेणफडू तडवी, रमेश गायकवाड, योगेश बडगुजर आदी उपस्थित होते.
हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive






