जळगाव, 4 जानेवारी : वर्षाच्या अखेरीस गायब झालेली थंडी ही नववर्षाच्या सुरूवातीलाच वाढली आहे. राज्यात पुन्हा एकदा थंडीचं कमबॅक झालं असून वातारवणातील गारठा वाढलाय. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासह धुळे आणि नंदुरबारमध्ये देखील थंडीचा जोर वाढलाय.
राज्यात थंडीचं कमबॅक –
मागील आठवड्यात थंडीचा जोर कमी झाला होता. मात्र, आता राज्यातील कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी घसरल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात सकाळपासून थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी 3 ते 4 अंश सेल्सिअसची घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात गारठा वाढण्याची शक्यता –
मागील आठवड्यात काही ठिकाणी आभ्राच्छादित तर काही ठिकाणी थंडीचा जोर कमी असल्याचे वातावरण होते. मात्र, आता पुन्हा एकदा थंडीने कमबॅक केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हळूहळू तापमान कमी होणार असून राज्यात सर्वत्र गारठा वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने आधी आर्द्रता आणि कमाल तापमान वाढल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला होता. आता पुन्हा एकदा नव वर्षाच्या सुरुवातीलाच थंडीची चाहूल लागली असून अनेक ठिकाणी सकाळच्या सुमारास धुक्याची चादर पसरली असल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्याचे पुढील तीन दिवसाचे तापमान –
- 4 जानेवारी – कमाल तापमान – 11 अंश
- 5 जानेवारी – कमाल तापमान – 12 अंश
- 6 जानेवारी – कमाल तापमान – 13 अंश
हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive