सोयगाव (छत्रपती संभाजीनगर) – सोयगाव तालुक्यातील नांदगांव तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगांव तांडा येथे आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन सरपंच अरुणाबाई कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या मेळाव्यात जवळपास 28 स्टॉल लावण्यात आले. त्यात पाणी पुरी, सॅन्डविच, बटाटा भजी, पावभाजी, बर्फी, गुलाब जामुन, खमंग, भेळ, पाववडा, लाडू, गाजर हलवा, आदी विविध प्रकारच्या पदार्थांचा गावकरी, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मनमुराद आस्वाद घेतला.
मुलांमध्ये व्यवसायाचे गुण विकसित व्हावे हा त्यामागचा हेतु होता. यामध्ये जवळपास 5 ते 6 हजारांची उलाढाल झाली. या कार्यक्रमास उपसरपंच अहमद शेख, कैलास पवार, ग्रा.प.सदस्य झावरू पवार, शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व मुख्याध्यापक सुर्यवंशी सर, सैंदाने सर, पाटील सर, पाटील मॅडम, माळी मॅडम आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.