जळगाव, 10 जानेवारी : विधानसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यात मोठ्या बहुमताने महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र, तरी देखील जळगाव जिल्ह्याचे राजकारण आजही तापल्याचे पाहायला मिळत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार गुलाबराव देवकर यांना गंभीर इशारा दिला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
जळगावात पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा बँकेतील शेतकर्यांचे पैसे गुलाबराव देवकरांनी घेतले आणि ते अजून फेडले नाहीत. मजूर फेडरेशनच्या माध्यमातून मजूरांचे पैसे घेऊन त्यांनी कर्ज घेतले आहे. मजूर सोसायटीच्या चौकशी संदर्भात डीडीआर यांची बैठक घेणार असून त्यात असलेले सर्व भ्रष्टाचारांचे कागदपत्र माझ्याकडे तयार आहेत. या मजूर सोसायटीमध्ये सरकारी नोकर आहेत आणि हे आयटी रिटर्न भरणारे असे मजूर सोसायटीत आहेत आणि या सोसायट्यांचा बॉस गुलाबराव देवकर आहेत.
दरम्यान, एवढा भ्रष्टाचार असतानाही ज्यांना गुलाबराव देवकरांना पक्षात घ्यायचं असेल त्यांनी घ्यावे. मात्र, गुलाबराव देवकर हे ज्याही पक्षात जातील त्याच पक्षावर शिंतोडे उडतील, अशी खोचक टीका पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर केली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtube.com/shorts/-KefvwrwiJ0?si=OWUOlYI7IInXaxmx
मंत्री पाटील यांचा देवकरांना गंभीर इशारा –
गुलाबराव देवकर ही चार वर्षांकरिता शिक्षेला असलेल्या स्थगिती मिळाली म्हणून घरात आहेत. गुलाबराव देवकरांच्या शिक्षेला मिळालेली स्थगिती यासाठी मी न्यायालयात देखील जाणार आहे. गुलाबराव देवकर साधू नाही तर घरकुल खाऊन उभे झालेला माणूस आहेत. आणि म्हणून मी यांना सोडणार नाही, त्यांच्या विरोधात मी न्यायालयात जाणार असून घरकुल घोटाळ्यात गुलाबराव देवकर हे बाहेर का? याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे, असा गंभीर इशारा मंत्री पाटील यांनी देवकरांना दिला आहे.
हेही वाचा : Bhusawal Crime News : भर चौकात तरुणावर गोळीबार, भुसावळातील हादरवणारी घटना, नेमकं काय घडलं?