अक्कलकुवा (नंदुरबार), 18 मार्च : नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाने काल झोडपले. लिंबाएवढ्या गारांनी शेतकऱ्याचे फार नुकसान झाले आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथेही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा फटका इतर पिकांसोबत भाजीपाल्याला सुद्धा बसला आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानामुळेशेतकरी चिंतेत आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील काठी परिसरात जोरदार पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या ईशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या अवकाळी पावसामुळे प्राण्यांसाठी पिकांच्या आणि गवताचा चाराही भिजून गेला आहे. तसेच खरबुज, डांगर, मका, गहू, हरभरा, भगर, हरा मुंग, दादर, आणि इतर पिक भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो, अशी शक्यता आहे.