मुंबई : वक्फ दुरुस्ती विधेयक उद्या 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेत सादर केले जाईल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावर चर्चेसाठी 8 तासांचा वेळ राखून ठेवला आहे. यानंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर होईल. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या सेनेला यांना आवाहन केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?’, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला आवाहन केले आहे.
हेही पाहा : Goshta Shetkaryachi | Ep 1 | एकेकाळी पाण्याची समस्या, आज 11 विहिरी | कसं शक्य झालं| गोष्ट शेतकऱ्याची
उद्या लोकसभेत दुपारी 12 वाजता वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यानंतर विधेयकावर लोकसभेत 8 तास चर्चा होईल. या चर्चेदरम्यान लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. तसेच चर्चेनंतर विधेयक मंजूर करण्यासाठी सभागृहात मतविभाजन होण्याची शक्याता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व खासदारांना लोकसभेत हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही आपल्या सर्व खासदारांना व्हिप बजावला असून सभागृहात उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकावर चर्चेसाठी 12 तासांचा अवधी मागितला आहे. त्याआधी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला आवाहन केले आहे.
नव्या विधेयकानंतर वक्फ बोर्डात काय बदल होणार?
आधी बोर्डाविरोधात अर्ज वक्फ लवादातच करता यायचा आता रेवेन्यू, सिव्हिल, हायकोर्टातही अर्ज करता येऊ शकतो. आधी दुसऱ्या धर्मातील व्यक्ती वक्फ बोर्डावर नसायचा, आता गैर मुस्लीम देखील आता वक्फ बोर्डावर असेल. तसेच आधी वक्फ लवादाच्या निर्णयाला आव्हान देता येत नव्हतं, आता हायकोर्टात आव्हान देणं शक्य होईल. यासोबतच आधी मशीद असणारी जागा वक्फ बोर्डाची असायची आता दान केलेली असेल तरच जमीन वक्फ बोर्डाची असेल.