मुंबई, 23 मे : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रूपयांची रक्कम आढल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असताना विधिमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्ष अर्जुन खोतकर याप्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान, माझा पीए किशोर पाटील याच्या नावावर ती खोली बूक झाली नसून विरोधकांकडून बदनाम करण्याचा डाव असल्याचे अर्जुन खोतकर यांनी याप्रकरणावर बोलताना सांगितले. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अर्जुन खोतकरांवर जोरदार निशाणा साधलाय.
अर्जुन खोतकर काय म्हणाले? –
आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावाने बुक करण्यात आलेल्या 102 क्रमांकाच्या खोलीत कोट्यवधी साडेपाच कोटी रूपयांची रक्कम ठेवल्याचा आरोप करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की, माझ्या स्वीय सहायकाच्या नावाने ती रूम नव्हती. माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेले सर्व आरोप आम्ही फेटाळतो. खरंतर, सरकार आणि समितीला बदनाम करण्यासाठी ठरवून प्लॅन करण्यात आलेला आहे का, असा आम्हाला संशय आहे.
कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबित –
धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मधून ही कोट्यवधींची रक्कम जप्त करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान, हे पैसे पकडल्यानंतर विधिमंडळाच्या अंदाज समितीसीठी पाच कोटी ठेवल्याचा आरोप धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. या आरोपांनंतर विधिमंडळाचे कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, ही चौकशी करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
किशोर पाटीलच्या निलंबनावरून संजय राऊतांचा खोचक सवाल –
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज सकाळी माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, आजच्या सामनामध्ये अंदाज समितीचे कार्य दिले आहे. धुळे प्रकरणाची चौकशी कालमर्यादेत झाले पाहिजे. पुरावा नष्ट करण्यासाठी एकनाथ शिंदे तसेच अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून धमकी दिले जाईल आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केली जाईल.
View this post on Instagram
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी स्थापन केली त्यापेक्षा गुन्हा दाखल केला असता आणि त्या पीएला ताब्यात घेतले असते व ही केस ईडीकडे दिली असती तर आम्हाला आनंद झाला असता. मात्र, एवढी रक्कम जमा करून सुद्धा देवेंद्र फडणवीस कोणाला वाचताएत..अर्जुन खोतकर की स्वतःला?, असा सवाल राऊतांनी केलाय. दरम्यान, ही अंदाज समिती गेल्या काही काळामध्ये ठिकठिकाणी गेली. तिथे कोणत्या हॉटेलमध्ये आणि कोणत्या विश्रामगृहात ह्याच महाशयांनी आपल्या बॉससाठी पैसे जमा केलेयाबाबतची माहिती फडणवीसांना हवे असेल तर ती माहिती द्यायला तयार असल्याचे राऊत म्हणाले.
‘त्या’ गरिब माणसाला का निलंबित केलं? –
अर्जुन खोतकर जर म्हणत असतील की विरोधकांचं बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. मग त्या किशोर पाटीलला का निलंबित केलं. तो शासकीय कर्मचारी म्हणून तिथे का आला होता. तो कोणाचा पीए होता. त्या गरिब माणसाला का निलंबित केलं, असे खोचक सवाल करत खासदार संजय राऊत यांनी धुळे प्रकरणावरून निशाणा साधलाय. दरम्यान, हे सर्व चोर असून चोर चोराला वाचवत आहेत आणि चोर कधी चोरी कबूल करतो असा सवाल करत खोतकरांचा पुर्वइतिहास पाहा, अशी टीकाही राऊतांनी अर्जुन खोतकर यांच्यावर केलीय.
हेही वाचा : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज काय?