मुंबई, 13 ऑक्टोबर : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या आईसह मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावरून पुन्हा एकदा राज्यात राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू असताना भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मोठा दावा केलाय.
काय म्हणाले नवनाथ बन? –
भाजप प्रवक्ते नवनाथ बन पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यात आतापर्यंत सहा वेळा भेट झाली. मात्र, तरी देखील त्यांनी युतीबाबत घोषणा केली नाही. कारण, त्यांना जोपर्यंत सोनिया गांधी तसेच राहुल गांधी हे हिरवा कंदिल दाखवत नाही तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यातील युती आणि आघाडीचा निर्णय होऊ शकत नाही.
दरम्यान, जोपर्यंत आम्हाला विचारत नाही तोपर्यंत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका तसेच त्याबद्दलची घोषणा करू नका, असे राहुल गांधींनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सांगितले असल्याचे दावाही नवनाथ बन म्हणाले.
View this post on Instagram
राज-उद्धव ठाकरे यांच्यात सहाव्यांदा भेट –
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आतापर्यंत सहाव्यांदा भेट झालीय. मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन बंधू एकत्र आले आणि त्यानंतर कालची ही त्यांची सहावी भेट आहे. दरम्यान, आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना राज-उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय युतीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाहीये. यामुळे येत्या काही दिवसात याबाबतची घोषणा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.