जळगाव, 4 नोव्हेंबर : शिवतीर्थ येथे सुरु असलेल्या प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी अलोट गर्दी उसळली. मंगळवारी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, भाजपा जळगाव महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, ग. स. चे माजी चेअरमन मनोज पाटील, एल. डी. एम. सुनील डोहरे, जिळगाव जिल्हा दुध उत्पादक संघाचे संचालक रोहित निकम, मा. जि. प. सदस्य आर. जी. पाटील व अनिल देशमुख, उद्योजक कंवरलालजी संघवी, अरुण बोरोले, भास्कर बोरोले, चंद्रकांत बेंडाळे, कृषी संचालक (आत्मा) अनिल भोकरे, भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, कृषी विज्ञान केंद्र ममुराबादचे प्रमुख हेमंत बाहेती, नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील तसेच जळगाव शहर आणि जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजच्या सात हजारांहुन अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली.
उद्या पुरस्कार वितरणाने होणार समारोप –
दिल्ली येथील फ्रेंड्ज़ एक्झिबीशन एण्ड प्रमोशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या माहितीचे प्रदर्शन गर्दीमुळे जळगावमध्ये चांगलेच यशस्वी ठरले आहे. पहिल्या दिवशीप्रमाणे दुसऱ्या दिवशीही शाळा आणि महाविद्यालायाच्या विद्यार्थ्यांबरोबर अनेक जळगावकरांनी सहकुटुंब भेट देत विविध विभागांची माहिती घेतली. या प्रदर्शनाचा बुधवार दि. 5 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता समारोप होणार आहे. यावेळी आकर्षक स्टॉल मांडणाऱ्या शासकीय विभागांना पारीतोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
युवकांनी घेतली कुक्कुटपालन योजनेची माहिती –
प्रदर्शनात आलेल्या सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशनच्या स्टॉलवर विविध प्रजातिचे कोंबड़े पाहुन युवक भारावले. यात साडेतीन किलोचा कावेरी, अडीच किलोचा कड़कनाथ लक्षवेधक ठरले. हे कोंबडे पाहुन युवकांनी कुक्कुटपालन कसे होते, कसे करायचे आणि यासाठी कोणत्या योजना आहेत, किती सबसिडी याची माहिती घेतली. या प्रदर्शनातुन कुक्कुटपालनसाठी नक्कीच जळगावचे तरुण पुढे येतील अशी माहिती आयुक्त पोपटराव पवार, किशोर कदम यांनी दिली.
शासकीय अभियांत्रिकी मुलांचे ड्रोन ठरले चर्चेचे –
या प्रदर्शनात स्थानिक महाविद्यालयांच्या मुलानी आपले शोध प्रकल्प मांडले आहेत. त्याम केसीई कॉलेजच्या मुलांची सोलरबेस सायकल चर्चेचा विषय ठरला. अडीच किलो वैटची बैटरी सोलर पैनलवर चार्ज होऊन एक टॉस 15 मिनिटे ताशी वेगाने पळते असे यश पाटील, दर्शन रहाडे यांनी सांगितले. गोदावरीच्या मुलांनी बनविलेली वयोवृद्धासाठीची चार्जर बाईक 250 वैट बैटरीवर 120 किमी रेंज इतकी पळते असे मयूर कोळी व राहुल कुमावत यांनी सांगितले. शासकीय अभियांत्रिकी मुलांचे ड्रोन प्रकल्प तर भलतेच लोकप्रिय ठरले. जळगावमधील सर्वात मोठे थ्री डी प्रिंटर आमच्या कॉलेजकडे असून आम्ही आर्मीसाठीचे मायक्रो ड्रोन, शेती फवारणीचे मोठे ड्रोन आणि फ़ोटो-वीडियो तसेच सुरक्षेचे टेहणळी ड्रोनचे मॉडेल विकसित करून प्रदर्शनात आणल्याचे सुमित भड़ आणि अर्णव पूरी यांनी सांगितले.






