• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 15, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

जळगाव, 15 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी महावितरणचा वायरमन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जळगाव पथकाच्या सापळ्यात अडकला आहे. 2 हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीने वायरमनला अटक केली असून आत्माराम धना लोंढे (वय -57, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर उपविभाग 1 जळगाव एमएसईबी) असे त्याचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार हे पेशाने डॉक्टर असून त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावे नवीन वीज मीटर घेण्यासाठी महावितरणचे वायरमन लोंढे यांच्याशी संपर्क साधला होता. नवीन वीज मीटर बसवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता आत्माराम धना लोंढे यांनी चार हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारांनी मागणीनुसार चार हजार रुपये दिले तरीही वीज मीटरचे काम करून देण्यात आले नव्हते.

यानंतर तक्रारदारांनी पुन्हा विचारणा केली असता आरोपीने आणखी दोन हजार रुपये दिल्याशिवाय काम होणार नसल्याचे सांगत लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार यांनी आज, 15 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव पथकाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबी पथकाने पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल –

पडताळणीदरम्यान आरोपी वायरमन आत्मराम धना लोंढे याने तक्रारदारांच्या मुलाच्या नावे नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली व पंचांसमक्ष ती स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोकॉ सचिन चाटे, पोकॉ अमोल सुर्यवंशी आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा : Video | शेतकऱ्यांसाठी पुढील चार वर्षात पक्के रस्ते; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेस मंजुरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला सरकारचा प्लॅन

बातमी शेअर करा !
Share
Tags: anti corruption bureaubribe casejalgaon acbjalgaon newsmarathi newsmidc police stationsuvarna khandesh livewireman bribe case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

December 16, 2025
Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

December 15, 2025
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

December 15, 2025
Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

December 15, 2025
Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

December 15, 2025
“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME)  पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

December 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page