• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 14, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव, 13 सप्टेंबर: केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘लखपती दीदी’ उपक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक महिलांची ‘लखपती दीदी’ म्हणून तयार झाल्या आहेत.

या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिला तसेच स्वयं सहायता बचत गटातील सदस्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि त्यांच्याकडून वार्षिक किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होईल याची हमी देणे हा आहे. योजनेअंतर्गत महिलांना विविध लघुउद्योग, गृहउद्योग तसेच उत्पादनाधारित व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये जिल्ह्यास १,००,००० महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्यक्षात १,०६,०७८ महिलांनी उद्दिष्टापेक्षा अधिक यश संपादन केले असून, त्यांना सुमारे रुपये ५०० कोटी इतक्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. तसेच वित्तीय वर्ष २०२५-२६ मध्ये १,११,००० महिलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, ते उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यात आले आहे. या वर्षाकरिता देखील सुमारे रुपये 750 कोटी कर्ज रक्कम मंजूर असून, संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात अर्थ सहाय्य वर्ग करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे.

या योजनेअंतर्गत महिलांकडून पारंपरिक उत्पादनांबरोबरच विविध अभिनव व मूल्यवर्धित वस्तूंची निर्मिती करण्यात येत असून, त्यांच्या उत्पादनांना राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना मिळत आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी कळविले आहे की, स्वयं सहायता गटांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत त्यांना व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक सहाय्य करण्यात येत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी वाढीस लागून महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण साध्य होत आहे.

हेही वाचा: उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

बातमी शेअर करा !
Share
Tags: drda jalgaonjalgaon newslakhpati didilakhpati didi jalgaon district statisticslakhpati didis schememarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

October 24, 2026
 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

October 24, 2026
नागरिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर; महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल यंत्रणेवर भर

नागरिक सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर; महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल यंत्रणेवर भर

October 24, 2026
VIDEO | महाराष्ट्रातील 282 माजी अग्निवीरांना पोलीस दलात नियुक्ती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

VIDEO | महाराष्ट्रातील 282 माजी अग्निवीरांना पोलीस दलात नियुक्ती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

October 24, 2026
‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

October 23, 2026
एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

October 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page