• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी! जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली; श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगावला नियुक्ती 

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 20, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
मोठी बातमी! जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली; श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगावला नियुक्ती 

जळगाव, 20 एप्रिल: राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या –

राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सातारा, सांगली, गडचिरोली, कोल्हापूर आणि जळगाव यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनात मोठे बदल होणार आहेत. या बदल्यांमध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदस्थापना बदलण्यात आली आहे.  दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्याला बदली –

जळगाव जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. महेश्वर रेड्डी यांची आता पुण्याला बदली करण्यात आली आहे. पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. रेड्डी यांनी त्यांच्या दोन वर्षांच्या काळात अनेक मोठे निर्णय घेतले. तसेच कायदा व सुवस्थेसाठी त्यांच्या नेतृत्वात महत्वपुर्ण उपाययोजना राबविल्या गेल्या.

आयपीएस श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगावला नियुक्ती –

डॉ. महेश्वर रेड्डी यांची जळगावातून बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत धिवरे हे  2014 बॅचचे IPS अधिकारी आहेत. धुळे येथे कार्यरत होण्यापूर्वी, त्यांनी पुणे लोहमार्ग पोलीस, गडचिरोली (पोलीस उपअधीक्षक), नवी मुंबई (उपायुक्त), बीड (अप्पर पोलीस अधीक्षक) आणि नागपूर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – ACB) येथे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

राज्यातील 9 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या खालीलप्रमाणे –

  1. तुषार दोशी यांची सातारा येथून सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली
  2. निखिल पिंगळे यांची पुणे येथील पोलीस उपआयुक्त पदावरून सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती
  3. संदीप घुगे यांना सांगलीवरून मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपआयुक्त (सुरक्षा) म्हणून नियुक्त
  4. योगेश गुप्ता यांना कोल्हापूरवरून गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक (अतिरिक्त जबाबदारी) म्हणून नियुक्ती
  5. निलोत्पल यांची गडचिरोलीवरूनकोल्हापूर येथे अधीक्षक म्हणून बदली
  6. एम. रमेश यांची अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावरून गडचिरोलीच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  7. डॉ. महेश्वर रेड्डी यांची जळगाववरून पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली
  8. श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगाव येथे अधीक्षक म्हणून नियुक्ती
  9. राजकुमार शिंदे यांना पुणेयेथून वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती

हेही वाचा: उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: dr maheshwar reddyips shrikant dhivareips transferredjalgaon newsjalgaon spsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

दप्तराचे ओझे कमी करा! ‘स्कूल बॅग पॉलिसी 2020’च्या अंमलबजावणीचे निर्देश

September 5, 2026
उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

जळगाव जिल्ह्यात स्वच्छ, सुंदर व हरित उपक्रम; प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाचे निर्देश

September 5, 2026
“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page