मुंबई, 23 मे: राष्ट्रवादी 17 जागांसाठी विधानसभेची घोषणा लोकशाही जाहीर वेग आला आहे. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच राज्याचे भाजपचे जेष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेच्या जागावाटपावर भाष्य केले आहे.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
मुंबईत मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यातील भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत. मात्र, राज्यात महायुती असून युतीधर्म आम्ही पाळणार आहोत. याअनुषंगाने मित्रपक्षांना काही जागा द्याव्या लागतील. यासाठी महायुतीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या चर्चा पार पडल्या असून जागावाटपाचा चेंडू हा मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात आहेत. दरम्यान, येत्या एक-दोन दिवसांत जागावाटपाबाबत चर्चा करून अंतिम निर्णय होईल, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
जळगावच्या जागेसाठी शिवसेना आग्रही –
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागा आपल्या वाटेला येण्यासाठी शिवसेनेदेखील आग्रही भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जळगावच्या जागेवर दावा केला असून ही जागा आम्हालाच मिळावी, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच मागील काळापासून शिवसेना हा जळगाव जिल्ह्यात कायम भाजपच्या पाठीशा राहिला असून आता मोठा भाऊ म्हणून भाजपने ही जळगावची जागा शिवसेनेला सोडावी, अशी स्पष्ठ भूमिका जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी मांडली आहे.
विधान परिषद निवडणूक कार्यक्रम –
- अधिसूचना जारी : 25 मे
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून
- अर्जाची छाननी : 2 जून
- अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून
- मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.
- मतमोजणी : 22 जून






