• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंसाठी “मदर मिल्क बँक” स्थापन करणार”

"जीएमसी" मध्ये अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 5, 2023
in जळगाव जिल्हा
“जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंसाठी “मदर मिल्क बँक” स्थापन करणार”
जळगाव, 3 सप्टेंबर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विविध ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण आरोग्यक्षेत्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कलियुगातील परमेश्वर म्हणजे डॉक्टर असून आता जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंसाठी “मदर मिल्क बँक” स्थापन करणार असल्याची घोषणा पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे काल शनिवारी पालकमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यावेळी पालकमंत्री पाटील हे बोलत होते.
सकाळी चार स्वयंचलित शस्त्रक्रिया खोल्या असलेल्या सुसज्ज, अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे देशातील सुप्रसिद्ध मणकारोग तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर ओपीडीतील कक्ष क्र. 114 बी येथे मणकारोग तपासणी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या  हस्ते करण्यात आले.
यानंतर जिल्हा नियोजन भवन येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव, मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन, निरामय सेवा फाउंडेशन, आणि जीएम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य क्षेत्रातील विविध वर्गांचे मणक्याचे आजार याविषयी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प. सीईओ अंकित, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. शेखर भोजराज, डॉ. अर्चना भोजराज, अधिष्ठाता गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन भायेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रस्तावनेत अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी, कार्यक्रमा मागील उद्देश स्पष्ट करून रुग्णालयाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्रीद्वयींचें आभार मानले. यानंतर डॉ. भोजराज यांनी, प्रशिक्षणाची गरज सांगितली. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महात्मा गांधी यांनी, ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र दिला होता. त्यानुसार ग्रामीण भागात आरोग्यसेवा करणाऱ्या आशा सेविका ह्या आरोग्य विभागाचा महत्वाचा कणा असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. डॉक्टर परमेश्वर समान असून त्यांच्या कौशल्याची उपलब्धता जिल्हावासीयांसाठी करून दिली जात आहे. डीपीडीसी माध्यमातून सामान्य रुग्णालयासाठी 84 कोटी निधी दिला आहे.
माता व बालसंगोपन साठी 35 कोटी तर मोहाडी रुग्णालयाला 75 कोटी मंजूर केले आहे. योग्य वेळी दूध न मिळाल्याने नवजात बालकांचे मृत्यू होतात. अशा बालकांना वेळेवर दूध मिळावे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात डीपीडीसी माध्यमातून “मदर मिल्क बँक”  स्थापन करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी यावेळी करीत, आरोग्य विभागासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, डॉक्टरांचे कार्य हे परमेश्वरी कार्य असून त्यांच्या कौशल्यामुळे जनसामान्यांना मोठा आधार मिळतो. मुंबईचे मणकारोग तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज हे रुग्णांसाठी आधारवड असून त्यांच्या वैद्यकीय कौशल्याचा फायदा जळगावच्या रुग्णांसाठी आपण उपलब्ध करून दिला आहे.
 राज्य शासनाच्या आरोग्याच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचे काम आशा, अंगणवाडी सेविका करीत असून त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले असल्याची सांगितले. डॉ. शेखर भोजराज यांच्या स्पाईन फाउंडेशनचे कार्य देशभरात सुरु असून कौतुकास्पद आहे. जळगावात त्यांची सेवा मिळाली, हे आपले भाग्य आहे. आता सरकारी रुग्णालयात मोफत उपचार सेवा सुरु झाली असून त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे, असे सांगून गिरीश महाजन यांनी. सामान्य रुग्णालयासाठी दर्जेदार काम व भरघोस निधी “डीपीडीसी”माध्यमातून दिल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी तर आभार डॉ. जोतीकुमार बागुल यांनी मानले. कार्यक्रमासाठी आरोग्यदूत रामेश्वर नाईक, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. किशोर इंगोले, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ योगिता बावस्कर, डॉ. विलास मालकर, दिलीप मोराणकर, संजय चौधरी, डॉ. सुनयना कुमठेकर, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, प्रकाश पाटील यांनी सहकार्य केले.
बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patilgulabrao patil jalgaonjalgaon civil hospitalmother milk bankmother milk bank jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page