इसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव (हरेश्वर) ता.पाचोरा, 7 सप्टेंबर : एकीकडे शाळेत शिक्षकांची कमतरता असताना देखील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी व दर्जेदार शिक्षण देण्याच्या हेतुने पिंपळगाव हरेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दु शाळेतर्फे चंद्रयान क्विज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे व कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणे, असा या उपक्रमाचा उद्देश होता. प्रश्नमंजुषामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषामध्ये प्रथम, द्वितीय व तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल सत्तार हे होते.
आपला देश भारत स्पेस रिसर्च व सॅटॅलाइट लॉन्चमध्ये अग्रिम आहे व शक्तिशाली बनत आहे. आपणही शिक्षण घेऊन आपल्या देशाला मजबूत बनवा व देशाची प्रगती मध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष शेख तालीब यांच्याकडून करण्यात आले. कार्यक्रमचे उद्दिष्ट शेख जावेद रहीम यांनी मांडले.