• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 28, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

जळगाव, 28 सप्टेंबर: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मंगळवार, 29 सप्टेंबर रोजी “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उद्योग व आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

राज्यातील जिल्हा, तालुका व औद्योगिक परिसरांमध्ये “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाइन (आभासी) पद्धतीने मुख्यमंत्री यांच्या हस्ते तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री यांच्या उपस्थितीत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथून करण्यात येणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयामार्फत दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील २३ ठिकाणी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे आयोजन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, अतिरिक्त एम.आय.डी.सी., भुसावळ रोड, जळगाव, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव, लिग्रॅड इंडिया प्रा. लि., एम.आय.डी.सी., अंजिठा रोड, जळगाव, सुप्रिम इंडस्ट्रिज, एम.आय.डी.सी., जळगाव; निमजाई फाऊंडेशन स्किल सेंटर, जुना नशिराबाद रोड, जळगाव; केमीस्ट भवन, गणेशनगर, नवीन जोशी कॉलनी, जळगाव; खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (KCE) महाविद्यालय, जळगाव; एस.एस.बी.टी. महाविद्यालय, बांभोरी, ता. धरणगाव; नगर परिषद हॉल, सावदा; युआयसीटी सेमिनार हॉल, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव; प्रताप महाविद्यालय, अमळनेर; सौ. रंजनीताई नानासाहेब देशमुख आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, भडगाव; राही फाऊंडेशन, नहाटा महाविद्यालय परिसर, जामनेर चौफुली, भुसावळ; आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, साखला कॉलनी, बोदवड; शिवनेरी फाऊंडेशन, चाळीसगाव; डॉ. केतकी पाटील फाऊंडेशन, तहसील कार्यालय सभागृह, चोपडा; दादासाहेब दिगंबर शंकर पाटील आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, एरंडोल; कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर; एस.एस.एम.एम. महाविद्यालय, पाचोरा; राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा; श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, रावेर; जेडीएमव्हीपी आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, यावल तसेच जामनेर रेवा गुर्जर मंडळ संचलित श्रीमंत बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालय, जामनेर येथे करण्यात आले आहे.

नोकरी इच्छुक युवकांसाठी या मेळाव्यात १० वी, १२ वी, सर्व शाखेतील पदवीधारक, आय.टी.आय. सर्व ट्रेड, बी.ई., बी.सी.ए., एम.बी.ए., BAMS, BHMS, नर्सिंग तसेच सर्व डिग्री पात्रता धारकांसाठी १,२५० पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने सुप्रिम इंड. लि., गाडेगाव/जळगाव, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, हिताची ॲस्टीमो ब्रेक सिस्टम्स इं. प्रा. लि., बांभोरी, जळगाव, एस.के. ऑईल, जळगाव, सिद्धार्थ केमिकल्स प्रोडक्ट्स लिमिटेड, जळगाव तसेच वनिता हॉस्पिटल, आयकॉन हॉस्पिटल, खडके हॉस्पिटल, वानखेडे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, आर.एल. हॉस्पिटल, आशा हॉस्पिटल, गणपती हॉस्पिटल आदी रुग्णालये तसेच फोकस हुंडाई, मानराज मोटर्स, मानराज मोटर्स True Value, चौधरी टोयोटा आदी शोरूममधील रिक्तपदांचा समावेश आहे. ही रिक्तपदे ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने कळविण्यात आली आहेत.

ज्या उमेदवारांनी नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनीही सर्व शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे व बायोडाटासह मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या Jalgaonskill या फेसबुक पेजला भेट द्यावी. तसेच अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव संदिप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

हेही वाचा: VIDEO | पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळेल: आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjob fairsmarathi newsrojgar mahakumbh maharashtrarojgar melavasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी; जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 28, 2026
जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

September 28, 2026
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रांतर्गत जळगाव जिल्ह्यात उद्या रोजगार मेळावा; 23 ठिकाणी आयोजन

September 28, 2026
VIDEO | पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळेल: आमदार किशोर आप्पा पाटील

VIDEO | पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळेल: आमदार किशोर आप्पा पाटील

September 27, 2026
मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

September 26, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page