• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रशासकीय क्षमता वाढवून योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 29, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 29 सप्टेंबर: महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. शासन यंत्रणेची क्षमता बळकट करणे, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे आणि योजनांच्या परिणामांचे प्रभावी मूल्यमापन यावर भर दिला जात आहे. या प्रयत्नांतून महाराष्ट्र विकसित राज्य म्हणून देशासाठी आदर्श निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे ‘भारताच्या विकासाला गती देणे : प्रभावी शासनासाठी राज्य-केंद्रित कृती आराखडा’ या विषयावर प्रा. कार्तिक मुरलीधरन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र शाश्वत सार्वजनिक वित्त समितीचे अध्यक्ष विजय केळकर, समितीचे सदस्य प्रा. कार्तिक मुरलीधरन तसेच सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपलब्ध साधनसंपत्तीतून अपेक्षित परिणाम साधणे हे राज्यापुढील प्रमुख आव्हान आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची क्षमता वाढविण्यावर शासनाने भर दिला आहे. गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून शासनाने १०० दिवस आणि १५० दिवसांच्या उद्दिष्टाधारित कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. या कालबद्ध कार्यक्रमांमध्येही क्षमता वृद्धीला प्राधान्य दिले आहे. विकसित महाराष्ट्राचा हा दीर्घकालीन प्रवास असून, त्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण आणि केंद्रित प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र लवकरच विकासाच्या बाबतीत देशात आघाडी घेऊन आदर्श निर्माण करेल.

व्याख्यानात मांडलेल्या संकल्पना आणि पुस्तकातील विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन सकारात्मकपणे काम करेल. संबंधित तज्ज्ञ आणि नव्याने गठित केलेल्या पथकाच्या सहकार्याने शासन अधिक प्रभावीपणे काम करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिक्षण, आरोग्य, पोषण, सार्वजनिक सुरक्षा, न्याय, सामाजिक संरक्षण आणि रोजगार या क्षेत्रांतील सार्वजनिक सेवा नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्यस्तरीय सुधारणा, प्रशासकीय क्षमता वृद्धी आणि पुराव्यावर आधारित धोरणांच्या अंमलबजावणीवर पुस्तकात भर देण्यात आला आहे. संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे शासनव्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी त्यात व्यवहार्य उपाय सुचविण्यात आले आहेत.

हेही वाचा: जळगावच्या ताफ्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’सात नव्या बसेस; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  लोकार्पण

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisdevelopmentmaharashtramarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

November 15, 2026
कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा; मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा; मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

November 15, 2026
आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

November 14, 2026
जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

November 14, 2026
समाजाचे संघटन हे केवळ मेळाव्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनावे – केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे

समाजाचे संघटन हे केवळ मेळाव्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनावे – केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे

November 14, 2026
जळगाव जिल्हा बँक निवडणूक: नाशिकमध्ये सहनिबंधकांकडून सुमित पाटील यांचा अर्ज वैध, पाचोऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: नाशिकमध्ये सहनिबंधकांकडून सुमित पाटील यांचा अर्ज वैध, पाचोऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

November 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page