• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 23, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

मुंबई, 23 ऑक्टोबर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, महाआयटीने तयार केलेल्या योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने केलेल्या संगणकीय प्रक्रियेनंतर, आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी १५.८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७ आणि तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२, अशा एकूण २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. आज एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

  • या यादीमध्ये एकापेक्षा अधिक बँकांकडून पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
  •  या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जथकबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्जथकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे.
  • या यादीतील राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांशी संबंधित काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्जथकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार ही सर्व कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.
  • योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी मृत, तसेच वयोवृद्ध आणि बोटांच्या ठशांची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे.
  • आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर जमा करण्यात येणार आहे.

हेही वाचा: 500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer loan waiver scheme listfarmer updatesmarathi newsminister babasaheb patilpunyashlok ahilyadevi holkar farmer loan waiver schemesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

‘एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!’; मंत्री प्रताप सरनाईक यांचा विभाग नियंत्रकांना स्पष्ट इशारा

October 23, 2026
एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

एकापेक्षा अधिक बँकांत कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

October 23, 2026
500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

500 कोटींच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटलांचा ‘ऑडिओ बॉम्ब’; राजकीय वर्तुळात खळबळ, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 22, 2026
संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा; ZP CEO करिश्मा नायर यांचे कंत्राटदार व अभियंत्यांना आवाहन

October 22, 2026
बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

बिश्नोई गँगच्या कारवायांवरून नाना पटोलेंची सरकारवर टीका; टायगर श्रॉफ प्रकरणावर खुलासा करण्याची मागणी

October 22, 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

October 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page