• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

जळगावात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 15, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

जळगाव, 15 नोव्हेंबर: केवळ रस्ते, पूल यांसारख्या भौतिक सुविधांचा विकास म्हणजे समाजाचा सर्वांगीण विकास नव्हे, तर त्यासाठी वैचारिक प्रगल्भताही तितकीच महत्त्वाची आहे. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवीत आहे. मात्र, या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी समाजातील सुशिक्षित नागरिक आणि युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी केले.

आदिवासी विकास विभागांतर्गत यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनजातीय गौरव दिना’च्या कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम झाला.

त्या पुढे म्हणाल्या, शासकीय यंत्रणेसोबतच नागरिकांनीही सामाजिक दायित्वाच्या भावनेतून एकत्रितपणे काम केल्यास क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे स्वप्न साकार होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भगवान बिरसा मुंडांचा क्रांतिकारी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवा : मंत्री गिरीश महाजन

भगवान बिरसा मुंडा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी दिलेला लढा, त्यांचे क्रांतिकारी कार्य आणि सर्वोच्च बलिदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यांच्या संघर्षातून तरुणांमध्ये देशप्रेमाची भावना आणि प्रेरणा निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य –

आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासोबतच त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर –

आदिवासी बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यातून स्थानिक महिला आणि भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत, प्रत्येक आदिवासी कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी या सप्ताहाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांसह पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आणि प्रशासन कार्यरत असल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

आदिवासी समाज शब्दाला जागणारा’ : खासदार स्मिता वाघ

आदिवासी समाज हा शब्दाला जागणारा समाज आहे. तो जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच सांगतो, अशा शब्दांत खासदार स्मिता वाघ यांनी आदिवासी समाजाच्या प्रामाणिकपणाचा गौरव केला. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच जल, जंगल आणि जमीन या हक्कांच्या रक्षणासाठी ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

आदिवासी समाजाची संस्कृती, नृत्य आणि परंपरा यांचे जतन करून हा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श भावी पिढीने जोपासावा, असे आवाहनही त्यांनी केले.

चित्रमय जीवनपट, योजनांचे प्रदर्शन –

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती कार्यालयाच्या परिसरात भगवान बिरसा मुंडा यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास चित्रमय फलक आणि आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आला होता. तसेच आदिवासी बांधवांसाठी प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारे फलकही लावण्यात आले होते.

पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचत गटाला १० हजार रुपयांचा धनादेश आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विविध शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

भव्य रॅलीचे आयोजन –

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जी.एस. ग्राउंड येथून सुरू झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या रॅलीत विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यांची होती उपस्थिती –

आमदार सुरेश भोळे, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी रमेश धापके, तहसीलदार शितल राजपूत, सहायक प्रकल्प अधिकारी प्रविण दाभाडे, पवन पाटील, मिनाक्षी सुलताने, लेखाधिकारी दिपकांत वाघ, मनेश तडवी, विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, जिल्हा व तालुका पातळीवरील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आदींसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; नवी मुंबई देशात प्रथम

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhagwan birsa mundajalgaon newsjanjatiya gaurav dinmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचा सहभाग महत्त्वाचा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

November 15, 2026
कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा; मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा; मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

November 15, 2026
आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

आडगाव येथे उद्या 15 नोव्हेंबर रोजी ‘खान्देश कर्तृत्त्वपर्व 2026’ व ‘वेध’ वार्षिकांकाचा प्रकाशन सोहळा

November 14, 2026
जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

November 14, 2026
समाजाचे संघटन हे केवळ मेळाव्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनावे – केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे

समाजाचे संघटन हे केवळ मेळाव्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनावे – केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे

November 14, 2026
जळगाव जिल्हा बँक निवडणूक: नाशिकमध्ये सहनिबंधकांकडून सुमित पाटील यांचा अर्ज वैध, पाचोऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

जळगाव जिल्हा बँक निवडणूक: नाशिकमध्ये सहनिबंधकांकडून सुमित पाटील यांचा अर्ज वैध, पाचोऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

November 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page