मुंबई, 16 ऑक्टोबर : राज्य सरकारतर्फे अलीकडच्या काळात शेतकरी तसेच महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात असतानाच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुलींच्या सक्षमीकरणासाठी नुकताच महत्वाच्या योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही योजन नेमकी आहे तरी काय?
‘लेक लाडकी योजना’ –
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मागील बैठकीत घेण्यात आला. या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलींचा जन्म झाल्यावर पाच हजार रूपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रूपये, सहावीत गेल्यावर सात हजार रूपये, 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर 75 हजार रूपये अशा रीतीने त्या मुलीस एकूण 1 लाख 1 हजार रूपये एवढा लाभ मिळणार आहे.
अशी मिळणार मुलींना आर्थिक मदत –
- मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये
- मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये
- मुलगी सहावीत गेल्यावर 7,000 रुपये
- मुलगी अकरावीत गेल्यावर 8,000 रुपये
- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
कोण आहे योजनेस पात्र? –
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रूपयांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.