ईसा तडवी, प्रतिनिधी
सामनेर (पाचोरा), 19 ऑक्टोबर : पाचोरा-भडगांव तालुक्यातील विद्यार्थांना विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी शैक्षणिक उपक्रम आणि फिरत्या विज्ञान प्रदर्शन शाळेचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते सामनेर येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उद्घाटन करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन –
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील व सावित्रबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने फिरत्या विज्ञान प्रदर्शन शाळेचे सामनेर येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रयोग शाळेच्या टीमच्यावतीने विज्ञानविषयक माहिती देण्यात आली. तसेच यावेळी विविध प्रयोग करण्यात आले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील तसेच विद्यालयाचे चेअरमन बाळू अण्णा , मुख्याध्यापक भोसले सर, ए. एन. चौधरी, जी. डी. पाटील, जी.एम. नानोटे, डी.व्ही. निकुंभ, आर.आर. भोसले, एस.बी.पाटील, डी. एस. पाटील, संगीता पाटील, वसईकर मॅडम आदी. शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी सामनेर ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच परिसरातील गावातील नागरिक उपस्थित होते.
या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती –
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रयोग शाळेची टीम तसेच लासगाव, बांबरुड राणीचे, आसनखेडा, माहेजी, कुरंगी, नांद्रा, वरसाडे, दहिगाव, डोकलखेडा , पहाण येथील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.