चाळीसगाव, 28 ऑक्टोबर : चाळीसगाव तालुक्यातील देवळी गावाच्या वॉर्ड क्रमांक 1 साठी येत्या 5 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. यासाठी शेतकरी विकास पॅनेल आणि प्रगती पॅनल या दोन्ही पॅनलमध्ये काट्याची लढत होणार आहे.
वॉर्ड क्रमांक 1 च्या सदस्याचे निधन –
देवळी गावातील ग्रामपंचायतीमध्ये 11 सदस्य आहेत. यामध्ये वॉर्ड क्रमांक 1 चे ग्रामपंचायत सदस्य मोहन रणा भिल्ल यांचे निधन झाल्याने वॉर्ड क्रमांक 1 जागा रिक्त होती. त्यांच्या निधनानंतर आता याठिकाणी निवडणूक होत आहे. एका जागेसाठी ही लढत होणार आहे. यासाठी शेतकरी विकास पॅनेल आणि प्रगती पॅनल या दोघांमध्ये काट्याची लढत होणार आहे.
कधी होणार निवडणूक –
या निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनेलच्या वतीने गायकवाड अरुण माणिक (निशाणी – शिट्टी) तर प्रगती पॅनलच्या वतीने सोनवणे योगेश कैलास (निशाणी कपबशी) हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी येत्या 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर यानंतर 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
पॅनेलचे नेतृत्त्व कुणाकडे –
शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्त्व हे छगन तुळशीदास पाटील हे करत आहेत. तर प्रगती पॅनेलचे नेतृत्त्व माजी सरपंच दिवगंत भगवान तुकाराम पाटील यांचे पुतणे अतुल अशोक पाटील हे करत आहेत. याआधी अतुल अशोक पाटील यांच्या पत्नी अर्चना अतुल पाटील या अडीच वर्ष सरपंच होत्या.
मोहन रणा भिल्ल यांच्यानिधनानंतर वॉर्ड क्रमांक 1 ची जागा रिक्त होती. यानंतर आता ही पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, आज शेतकरी विकास पॅनेलच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ झाला. या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.