ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 07 नोव्हेंबर : पाचोरा-भडगाव तालुक्यातील डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी ‘आरोग्य तुमचे काळजी आमची’ या उपक्रमातून निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे तालुक्यातील गावांमध्ये ठिकठिकाणी डासनियंत्रक फवारणी करण्यात आहे. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते आज सकाळी वरखेडी व भोकरी येथे जंतुनाशक डास नियंत्रक फवारणी करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपुत, उपजिल्हा प्रमुख उध्दव मराठे, शेतकरी नेते रमेशजी बाफना, व सर्व शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या की, शहर व तालुक्यामध्ये सध्या डेंग्यू, ताप, मलेरिया, सर्दी व खोकला अशा विविध आजारांच्या साथीने थैमान घातले आहे. ही आजाराची साथ वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना राबविणे अतिशय आवश्यक आहे.
वैशाली सुर्यवंशी पुढे म्हणाल्या की, डेंग्यूच्या साथीने अनेक कुटुंब व अनेक लोक त्रस्त आहेत. याची दखल घेऊन आम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी व प्रतिबंधात्मक सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात व ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकीतून जंतुनाशक डास नियंत्रक फवारणीचे नियोजन केले आहे. या नियोजनाअंतर्गत शहरात व ग्रामीण भागात 23 ऑक्टोबरपासून सुरूवात डासनियंत्रक फवारणीची सुरूवात करण्यात आली आहे.
याप्रसंगी वरखेडी येथे ग्रामपंचायत सरपंच सविता चंद्रकांत पाटील, चंद्रकांत प्रकाश पाटील, माजी ग्रामपंचायत सरपंच धनराज विसपुते, ग्रामपंचायत सदस्य विजय, दशरथ भोई, निर्भय मोरे, ग्रामविकास अधिकारी नन्नवरे भाऊसाहेब, ग्रामपंचायत शिपाई कर्मचारी धनराज भोई, अंकुश पाटील, शंकर बोरसे, चौधरी निलेश भोई, बटू चौधरी, व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. तसेच भोखरी येथे सरपंच मौलाना अरमान अब्दुल कादर उपसरपंच जलील रफिक काकर आणि असलम रुस्तम काकर, अफसर शकूर काकर, नबी अब्दुल शेख, फरजानाबी सलीम काकर, शाहीनबी मुक्तार शेख, रजियाबी अब्दुल ककर, हसननूरबी महमूद काकर, जावेद नादर काकर, शहनाजबी अल्ताफ शेख, सुफियाबी स्माईल काकर, फिरोजाबी अलीम काकर, डॉक्टर अश्फाक जाकीर काकर जाकीर हलवाई, हकीम टेलर रज्जाक, हाजी अब्दुल बिके, जुम्मा नाना स्माईल, जुम्मा गुलाब मुल्लाजी, अरबाज डी एम एल टी मोसिन ऑफिस सुलतान अल्ताफ व्यापारी समीर हुजेफा फैयाज अख्तर जाफर अरुण काकर जब्बार बीके रेहान काकर इम्रान काकर चंदू पाटील विसपुते अण्णा दिलीप बाई अल्ताफ हलवाई पोलीस पाटील भोकरे सलीम भाई भुऱ्या भगवान धोंडू शंभूराज संजय सुपडू चौधरी शंकर दौलत, बापू चौधरी, संभा चौधरी, आदी उपस्थित होते.