• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलला भारत सरकारचा ‘सर्वोच्च संस्था’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Government of India's 'Sarvochha Sanstha' National Award announced to Deepastambh Foundation Manobal

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 25, 2023
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलला भारत सरकारचा ‘सर्वोच्च संस्था’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

जळगाव (प्रतिनिधी), 25 नोव्हेंबर : भारत सरकार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचा ‘सर्वोच्च संस्था’ राष्ट्रीय पुरस्कार दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलला नुकताच जाहीर झाला आहे. 3 डिसेंबर रोजी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे .पुरस्कार महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरीत होणार आहे.

देशातील पहिलाच असा प्रकल्प – 

मनोबल हा प्रकल्प देशातील पहिला प्रकल्प आहे, ज्यामध्ये 18 वर्षावरील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना विनामूल्य निवासी सर्व प्रकारचे उच्च शिक्षण व त्यासाठी आवश्यक स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जाते. सर्व प्रकारच्या दिव्यांगांसोबतच सर्व समावेशित शिक्षणासाठी आवश्यक वातावरण निर्माण होण्यासाठी दिव्यांगांसोबतच 18 वर्षांवरील अनाथ, आदिवासी ग्रामीण, ट्रान्सजेंडर विद्यार्थी, विद्यार्थिनींना सुद्धा एकत्र निवासी शिक्षण प्रशिक्षण या प्रकल्पात दिले जाते. या प्रकारचा हा देशातला पहिला आदर्श प्रकल्प मानून राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार संस्थेला या वर्षी जाहीर झाला आहे.

मनोबल प्रकल्पात जळगाव व पुणे येथे 12 राज्यांमधील व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील 380 विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण प्रशिक्षण घेतात, सोबतच देशभरातील सुमारे 500हुन अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण प्रशिक्षण दिले जाते. त्यासोबतच अफगाणिस्तान, भूतान, पाकिस्तान श्रीलंका येथील विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाते. संस्थेने लोकसहभागातून देशातील पहिला सर्व प्रकारच्या दिव्यांगांना अडथळाविरहित असणारा निवासी उच्च शिक्षणासाठीचा प्रकल्प नुकताच बांधून पूर्ण केला आहे. या मध्ये उच्च शिक्षणाची तसेच स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणाची, तंत्रज्ञान प्रशिक्षणाची सुविधा आहे. संपूर्ण परिसर दिव्यांगांसाठी अडथळाविरहित आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे मानव संसाधन सुद्धा उपलब्ध आहे.

काय म्हणाले दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन?

समाजातील मुख्य प्रवाहामध्ये दिव्यांग आणि वंचित विद्यार्थी आले पाहिजे. फक्त सामान्य रोजगारा पर्यंत ते सिमीत न राहता समाजाच्या सर्व प्रभागात उदारणार्थ प्रशासन, शासन, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, सामाजिक कार्य, शिक्षण अश्या सर्व क्षेत्रांमध्ये उच्च स्तरावर हे विद्यार्थी जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्था एकाच छताखाली संस्थेने लोकसहभागातून निर्माण केलेल्या आहेत.संस्थेत कार्यरत सहकारी, देणगीदार व हितचिंतक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच या आधी कधीही न घडलेले कार्य संस्थेच्या माध्यमातून उभे राहीले आहे अश्या भावना यावेळी दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केल्या आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: deepstambha foundationdeepstambha foundation jalgaondeepstambha foundation jalgaon manobaljalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

March 7, 2026
VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

March 6, 2026
आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

March 6, 2026
‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

March 6, 2026
Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

March 5, 2026
VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

March 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page