ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 28 जानेवारी : विद्याताई पाटील यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर जिद्दीने एमपीएससी परिक्षेत राज्यात सातवा क्रमांक मिळवून पाचोरा तालुक्याचा लौकीक वाढविला आहे, असे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत दैदीप्यमान यश संपादन करणार्या विद्या पाटील यांच्या यशाबाबत भावना व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
विद्या पाटील यांचे एमपीएससी परिक्षेत यश –
मूळच्या पाचोरा तालुक्यातील रहिवासी असणार्या विद्या राजेंद्र पाटील ( सासरचे नाव सौ. विद्या पुरूषोत्तम शिरसाठ ) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मोठे यश संपादन केले आहे. त्यांनी अलीकडेच जाहीर झालेल्या राज्यसेवा परिक्षेत राज्यातून सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याची कामगिरी बजावली आहे. अलीकडेच गेल्या वर्षी त्या विक्रीकर निरिक्षक म्हणून रूजू झाल्या होत्या. यानंतरआता क्लास वन अधिकारी बनणार आहे.
विद्याताई पाटील यांच्या या यशाचे वैशालीताई सुर्यवंशी यांनी मोठे कौतुक केले आहे. आज महिला विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर असतांना विद्याताईंनी ग्रामीण भागात शिक्षण घेऊन देखील राज्य पातळीवरील प्रतिष्ठेच्या विषयात मिळवलेले यश हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद करत त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या योजना पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन तावडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले आदी उपस्थित होते.
हेही वाचा : लोहारी येथील फौजी पोलीस ग्रुपच्या माध्यमातून कौतुकास्पद कार्य, विद्यार्थ्यांचे वाढत आहे मनोबल