नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : केंद्र सरकारच्या विरोधात ‘चलो दिल्ली’चा नारा देत शेतकरी आंदोलनावर कायम असून हजारो शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, हे जाऊन घेऊयात.
मागील वर्षी शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी राजधानीत दिल्लीत आंदोलन केले होते. आतापुन्हा शेतकऱ्यांना आंदोलनास सुरूवात केली असून हजारो शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावी, यासाठी केंद्र सरकारने उपाययोजनेस सुरूवात केली असून मोठ्या प्रमाणात कडकोट सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त सरकारने केला आहे.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या? –
- बाजारातील अनिश्चितेचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देणारा कायदा लागू करा
- विद्युत कायदा रद्द करा.
- लखीमपूर खेरी येथे मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्यांवरील खटले मागे घ्या.
- मागील आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई द्या.
- भूसंपादन कायदा 2013 पुनर्स्थापित करणे.
- जागतिक व्यापर संघटनेतून माघार घेण्याची मागणी.
हेही वाचा : ‘महाराष्ट्रामध्ये निष्ठावान लोकांची गरज,’ आंबेगाव येथील महासभेत शरद पवार नेमकं काय म्हणाले?