• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप, भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 4, 2024
in जळगाव जिल्हा, खान्देश, चाळीसगाव, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र
मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप, भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 3 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात राजकीय भूकंप झाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकिट कापण्यात आलेले भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

खासदार उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत –
मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आज दुपारी पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी प्रवेश केला. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे,मनपा माजी विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, ॲड. ललिता पाटील,विराज कावडीया सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

जळगावात भाजपला धक्का –
गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, काल त्यांनी मुंबईत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर थोड्याच वेळाने त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत पक्षप्रवेशाबद्दल चर्चा केली. दरम्यान, आज उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

स्मिता वाघ यांच्याविरोधात कट्टर लढत –
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदारकीची लढत एकतर्फी मानली जात होती. या पार्श्वभूमीवर स्मिता वाघ यांनी प्रचारास देखील सुरूवात केली होती. मात्र, तिकिट कापल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासूनच खासदार उन्मेष पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, जिल्हास्तरीय ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करत जळगाव लोकसभा मतदारसंघात खासदारकीच्या निवडणुकीसाठी भाजपपुढे नवे आव्हान उभ केले असून स्मिता वाघ यांच्याविरोधातील लढत कट्टर होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

भाजपविरोधात ठाकरे गटाकडून कोण लढणार –
भाजपने खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कापल्याने ते नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्याबाबत सावध पवित्रा घेतला होता. दरम्यान, ठाकरे गटात प्रवेश केल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी उन्मेष पाटील दावेदार मानले जात असताना पारोळ्याचे करण पवार यांचे नाव देखील आघाडीवर आहे.

हेही वाचा : ‘…त्यांचा स्वभाव चंचल; 2014 लाच ते शिवसेनेच्या संपर्कात होते’, उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशावर मंगेश चव्हाण यांचा मोठा दावा

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpjalgaonShivsena UBTuddhav thackerayunmesh patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

July 25, 2026
अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

July 24, 2026
पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

July 24, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

July 24, 2026
छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

July 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page