• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘या गद्दारीचे सूत्रधार मोदी अन् शहा, त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूपसला”, ठाकरेंचा जोरदार प्रहार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 15, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
‘या गद्दारीचे सूत्रधार मोदी अन् शहा, त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूपसला”, ठाकरेंचा जोरदार प्रहार

नाशिक, 15 मे : शिवसेनेतील गद्दारीचे सूत्रधार मोदी आणि शहा आहेत. मोदी आणि शहांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूपसला आहे, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी नाशिकमध्ये सभा घेतली. या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी तसेच अमित शहांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे –
शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. पण, काही पावटे, शिवसेनेला नकली म्हणत आहेत. त्यांना कुठे मोड फुटलंय मला माहिती नाही. इथपर्यंत मजल गेली की, हिंदूहृदयसम्राटांचा मी पूत्र आणि तेलंगणाच्या निवडणुकीच्या भाषणात, हे मला नकली संतान म्हणाले.

आज माझं तुम्ही सगलं चोरलं आहे, चोराच्या हातात धनुष्यबाण दिला, मशाल पाहा कशी पेटली आहे. त्यांच्याकडे फौजफाटा असूनही ते उद्धव ठाकरेला घाबरत आहेत. राजकारणात भाजपला पोरंच होत नाही. म्हणून त्यांना नकली संतानं, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागलेत. 70 हजार कोटी रुपयांचा आरोपी असलेला व्यक्ती उपमुख्यमंत्री असेल तर मुख्यमंत्री कितीचा असेल, असा सवाल करत त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.

महाराष्ट्र तुम्हाला गुजरातमध्ये पाठवायला पुरेसा –
माझा कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्राचा आहे, त्याच्यावर निर्यातबंदी आहे. निर्यात जर का काढली, तर कर लावलात. पण स्वत:च्या गुजरातमध्ये निर्यातबंदी उठवून तुम्ही त्यांना निर्यातीची परवानगी देतात. हा भेदभाव तुम्ही का करत आहात. जर तुम्ही महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये असा भेदभाव करत असाल, तर हा महाराष्ट्र तुम्हाला गुजरातमध्ये पाठवायला पुरेसा आहे. गद्दारांना 50 खोके देता आणि माझ्या कांदा उत्पादकाला भाव नाही, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री होतो, चपरासी झालो तरी चालेन पण मी पुन्हा येईन, या शब्दात त्यांनी नाव न घेता फडणवीसांवरही निशाणा साधला.

गद्दारीचे सूत्रधार मोदी आणि शहा –

“2014 आणि 2019 मध्ये मीच मोदींसाठी मते मागायला आलो होतो. ही मोठी चूक झाली. कारण यांच्या मनामध्ये जे विष आहे, हे विष आता बाहेर पडले आहे, ज्या पद्धतीने त्यांनी माझा घात करण्याचा प्रयत्न केला, सोन्यासारखी माझी शिवसेना, छत्रपतींचा पवित्र भगवा, मोदी तुम्ही त्या भगव्याला गद्दारीचा कलंक लावलेला आहे. याचा पुरावा या मिंध्यांनीच दिला आहे. गेल्या आठवड्यात मिध्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं की, मी करेक्ट कार्यक्रम केला आणि मग मोदी आणि शहांना सांगितलं मी माझं काम केलंय आता पुढचं काम तुम्ही करा आणि मग मोदीजी आणि शहाजींनी खरी शिवसेना धनुष्यबाण हा आपल्याला दिला”, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदर्भ देत त्यांच्यावर जोरदार टीका केली. या गद्दारीचे सूत्रधार मोदी आणि शहा आहेत. मोदी आणि शहांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खूपसला आहे.

हेही वाचा : मोठी बातमी, पाचोऱ्यातील जारगाव चौफुली येथे भीषण अपघात, पती समोर पत्नीचा जागीच मृत्यू 

बातमी शेअर करा !
Share
Tags: Amit Shahnarendra modinashikuddhav thackerayuddhav thackeray criticsuddhav thackeray nashik sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

July 9, 2026
SIR मोहिमेत साहेबराव चौधरी ठरले जळगाव जिल्ह्यात 100% काम पूर्ण करणारे पहिले BLO

SIR मोहिमेत साहेबराव चौधरी ठरले जळगाव जिल्ह्यात 100% काम पूर्ण करणारे पहिले BLO

July 9, 2026
गोवंश संरक्षणाचा मुद्दा विधानसभेत; गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

गोवंश संरक्षणाचा मुद्दा विधानसभेत; गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

July 9, 2026
“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

July 8, 2026
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

July 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page