जळगाव, 26 मे : जळगाव जिल्ह्यात तापमाने उच्चांक गाठला असताना काल जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याची देखील माहिती समोर आली. यामध्ये यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर आणि भुसावळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला.
काय आहे संपूर्ण बातमी? –
जळगाव जिल्ह्यासह एकीकडे तापमानाचा पार वाढल्याने नागरिक उन्हाने त्रस्त झाले असताना जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी पावसामुळे वातावरणात काही वेळ गारवा निर्माण झाला होता. भुसावळ परिसरात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडली तर काही ठिकाणी फलकही खाली पडले.
केळी बागांचे नुकसान –
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने केळी बागा होरळपत असताना काल झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात 15 ते 16 गावांमध्ये केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. दरम्यान, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वादळामुळे हिरवला गेला. तसेच घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
हेही वाचा : रामदेववाडी अपघात प्रकरणी मोठी अपडेट, तिसऱ्या आरोपीलाही 27 मेर्यंत पोलीस कोठडी