• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला’, शिवसेना पक्षफूटीवर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरुन शंकराचार्यांनी काल सोमवारी मातोश्रीवर भेट दिली.

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
July 16, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
swami avimukteshwaranand saraswati met uddhav thackeray

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरुन शंकराचार्यांनी काल सोमवारी मातोश्रीवर भेट दिली.

मुंबई : आम्ही सर्वजण हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे पालन करणारी लोकं आहोत. आमच्या इथे पुण्य-पाप याबाबत सांगितले गेले आहे. सर्वात मोठा घात गौघात आहे. पण त्यापेक्षाही मोठा घात हा विश्वासघात आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे आणि याबाबत अनेकांच्या मनात दु:ख आहे, असे परखड मत ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीवर –

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरुन शंकराचार्यांनी काल सोमवारी मातोश्रीवर भेट दिली. यावेळी झालेल्या पूजाविधीदरम्यान, उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. मातोश्रीवरील भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही शिवसेनेतील पक्षफूटीवर आपले मत व्यक्त केले.

नेमकं काय म्हणाले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद –

माध्यमांशी बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, आज आम्ही इथे उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणावरुन आलो. त्यांनी स्वागत केले. आम्ही त्यांना बोललो की, तुमच्यासोबत विश्वासघात झाला याबाबत आमच्या सर्वांच्या मनात दु:ख आहे. जोपर्यंत पुन्हा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत नाहीत, तोपर्यंत आमच्या मनातील दु:ख दूर होणार नाही.

जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही –

जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू आहे, कारण त्याच्यासोबत विश्वासघात झाला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी विश्वासघात केला, ते हिंदू कसे असू शकतात, असा सवालही त्यांनी शिंदे गटाचे नाव न घेता केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात याबाबत दु:ख आहे. निवडणुकीत हे दिसूनही आले. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला आहे, हे आता महाराष्ट्राची जनतेने स्विकारले आहे, यावरुन हे दिसते. त्यामुळे हा जनतेचा अनादर आहे. जनता ज्याला बहुमत देते, त्याला टिकवून ठेवले पाहिजे. मध्येच सरकार पाडणं, जनमताचा अनादर करणे हे योग्य नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केला.

जे योग्य असेल, तेच बोलणार –

शंकराचार्य जे योग्य असेल, तेच बोलतील. आम्हाला राजकारणाशी काहीही घेणंदेणं नाही. मात्र, आपल्या इथे विश्वासघात पाप सांगितले गेले आहे. याबाबत कोण बोलणार, धर्माचार्य यांनाच याबाबत बोलावे लागणार ना, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: matoshrishivsenashivsena splitswami avimukteshwaranandswami avimukteshwaranand saraswatiuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात भेट; अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते ठरले राज्याचे पहिले मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात भेट; अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते ठरले राज्याचे पहिले मुख्यमंत्री

June 7, 2025
महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार संदेश वाघ यांना जाहीर

महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार संदेश वाघ यांना जाहीर

June 7, 2025
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

June 7, 2025
Breaking! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे नियोजन

Breaking! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे नियोजन

June 6, 2025
छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आचरणात आणा- आमदार अमोल खताळ

छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आचरणात आणा- आमदार अमोल खताळ

June 6, 2025
Pachora Crime News : धक्कादायक! 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून; पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

Pachora Crime News : धक्कादायक! 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून; पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

June 6, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page