मिलींद वाणी, प्रतिनिधी
अडावद (चोपडा), 31 जुलै : चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विष्णापूर येथे साठवून ठेवलेला गांजा गुप्त माहितीवरुन अडावद पोलिसांनी जप्त करून आरोपीस अटक केली होती. दरम्यान, या धडक कारवाई तसेच गुन्हे प्रकटीकरणाबाबत अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांच्या पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान –
अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विष्णापूर येथील कारवाईत अडावद पोलिसांनी सुमारे 9 लाख 94 हजार 500 रूपये किमतीचा 66 किलो गांजा हस्तगत केला होता. अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोउनि राजू थोरात, पोहेकॉ ज्ञानेश्वर सपकाळे, पोहेकॉ संजय धनगर, पोहेकॉ भरत नाईक, पोहेकॉ फिरोज तडवी, पोहेकॉ जयदीप राजपूत, पोहिकों मधुकर पवार, पोकॉ सतीश भोई, पोकॉ भूषण चव्हाण यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली होती. याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कारवाईबाबत या पथकाचे अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी कौतुक केले आहे.
नेमकं काय घडलं होतं? –
चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाणे हद्दीत विष्णापूर गावातील शिवाजीपाडा परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये गांजा विक्री करण्यासाठी साठवणूक केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे अडावद पोलिस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत सायसिंग बरकत बारेला (36, रा. विष्णापूर, ता. चोपडा) यांच्या घरात छापा टाकून एकूण 9 लाख 94 हजार 500 रुपये किमतीचा 66 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.
तसेच 6 हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा 1 लाख रुपये किमतीची दुचाकी जप्त केली होती. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलीस अधीक्षकांकडून सदर कारवाईबाबत सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा : Big Breaking : वादग्रस्त महिला अधिकारी पूजा खेडकर यांचे IAS पद रद्द, UPSC ने केली मोठी कारवाई