ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 3 ऑगस्ट : भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात महिनाभरापासून लाभार्थींचा धान्यसाठा तांत्रिक कारणामुळे पडून होता. दरम्यान, पाचोरा काँग्रेसने ढोल बजाव आंदोलन करताच शासन प्रणाली खडबडून जागे झाली आणि तात्काळ धान्य पुरवठा करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिल्याची माहिती काँग्रेसचे पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिलीय.
काय आहे संपुर्ण बातमी? –
शासनातर्फे स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत लाभार्थ्यांना धान्य पुरवठा केला जातो. मात्र, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना संपुर्ण धान्य साठा मिळाल्यावर देखील लाभार्थींना तांत्रिक कारणामुळे ऑनलाइन प्रणाली नादुरुस्त असल्यामुळे वितरित करण्यात आला नव्हता. त्यामुळे पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक गेल्या महिन्याभरापासून वंचित होती.
धान्य पुरवठा ऑफलाइन करण्याचे आदेश –
काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली काल छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यासमोर झोपलेले शासन आणि सत्ताधारी आमदार यांना जागे करण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची गंभीर दखल उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी घेऊन पाचोरा-भडगाव तालुक्यातील लाभार्थी जनतेला तात्काळ धान्य पुरवठा ऑफलाइन करण्याचे आदेश पारित केल्याची माहिती पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिली. दरम्यान, या आंदोलनाला यश मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटीक, जिल्हा सचिव इरफान मनियार, युवक विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष कल्पेश येवले, ज्ञानेश्वर पाटील, महिला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, उपाध्यक्षा कुसुमताई पाटील, डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष डॉ. मंजूर खाटीक, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शरीफ शेख, तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, पिंपळगाव येथील प्रकाश चव्हाण, संदिप पाटील वाघुलखेडा, दिगंबर पाटील, शंकर सोनवणे, अल्ताफ खान, अजीम देशमुख, नदीम शेख, आबिद शेख जाबीर बागवान, मुस्तगिर टकारी, नईम मन्यार, रवी पावरा, सै. सय्यद युनुस मणियार, सचिन सोनवणे, आतिश सोनवणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत