• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking : शेतीच्या वादातून भावाचा खून, भडगाव तालुक्यातील हादरवणारी घटना, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 12, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम, ताज्या बातम्या, ब्रेकिंग, भडगाव, महाराष्ट्र
Breaking : शेतीच्या वादातून भावाचा खून, भडगाव तालुक्यातील हादरवणारी घटना, नेमकं काय घडलं?

महेश पाटील, प्रतिनिधी

भडगाव, 12 ऑगस्ट : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भडगाव तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे शेतीच्या वादातून मोठ्या भावानेच लहान भावाचा खून केल्याची हादरवणारी घटना घडली. दरम्यान, भडगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला दोन तासाच्या आत अटक केली. विठ्ठल आनंदा पाटील (वय 41) असे मृत व्यक्तीचे नाव असून अटक केलेल्या आरोपीचे नाव अभिमन आनंदा पाटील असे आहे.

नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल आनंदा पाटील हे त्यांच्या खळ्यात झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात कोणीतरी खुन केल्याचे दिसत असल्याची माहिती आज सकाळी पिचर्डे येथील पोलिस पाटील यांनी भडगाव पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत खात्री केली असता विठ्ठल पाटील हे पिचर्डे गावातील त्यांचे खळ्यात खाटीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. त्यांचे डोक्यावर धारधार शस्त्राने वार केलेले दिसून आले.

शेतीच्या वादातून खून –
भडगाव पोलिसांनी सदर गावातून माहिती काढली असता, मयत विठ्ठल आनंदा पाटील व त्यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील यांच्यात शेतीच्या वाटनी वरुन वाद सुरु होता. याच वादातून काल दिनांक 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मयत विठ्ठल आनंदा पाटील हे त्यांचे खळ्यात बकऱ्या बांधण्यासाठी तारजाळी बांधणार असल्याने त्यास मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील हा विरोध करत असल्याने त्यांच्यात खळ्यातच भांडण झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. दरम्यान, याच भांडणाचा धागा पोलिसांनी पकडत विठ्ठल आनंदा पाटील यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील याचा गावात व त्यांचे घरी शोध घेत असता ते घरी मिळून आले.

पोलिसांनी दोन तासाच्या आत आरोपीला घेतले ताब्यात –
यावेळी अभिमन आनंदा पाटील याच्या घरात त्याचे रक्ताचे भरलेले कपडे मिळुन आल्याने त्याला लागलीच भडगाव पोलीसांनी ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला पोलीस खाक्या दाखविताच त्याने त्यांचा लहान भाऊ विठ्ठल आनंदा पाटील यांचे डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खुन केल्याची कबुली दिली. दरम्यान, भडगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासातच आरोपीला ताब्यात घेत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. त्यावरुन मयत विठ्ठल आनंदा पाटील यांची पत्नी रेखाबाई विठ्ठल पाटील यांचे फिर्यादीवरुन भडगाव पोलीस स्टेशनला गुरन 260/2024 भारतीय न्याय संहिता 2024 चे कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गुन्ह्यातील तपास पोलीस अधिकारी-कर्मचारी –
सदरची कामगिरी जळगाव पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक (चाळीसगाव परिमंडळ) कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक (चाळीसगाव) अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, स.फौ. अनिल अहिरे, पोहेकाँ निलेश ब्राम्हणकार, पोहेकाँ मुकुंद परदेशी, पोकाँ प्रवीण परदेशी, पोकाँ महेंद्र चव्हाण, पोकाँ सुनिल राजपुत, पोकाँ संदिप सोनवणे, पोकाँ जितेंद्र राजपुत, पोकाँ संभाजी पाटील (चालक), होमगार्ड प्रदिप सुभाष पाटील यांनी केली. दरम्यान, या गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहेत.

हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon taluka crime newsbhadgon police stationlatest crime newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Breaking! विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

March 12, 2026
विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

March 12, 2026
मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

March 11, 2026
VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

March 11, 2026
चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

March 11, 2026
कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

March 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page