संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 13 सप्टेंबर : पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील स्वर्गीय वसंतराव जीभाऊ बहुउद्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालयात गणपती विसर्जनानिमित्त आज भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरम्यान, या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केले त्यातून सुमारे 25 ते 30 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
शिवरे दिगर येथे गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम विद्यार्थिनींनी जेवण केल्यानंतर 25 ते 30 विद्यार्थ्यांना त्यांना उलट्या, चक्कर, मळमळ हातपाय गळणे आदी त्रास होऊ लागला. यानंतर हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली साधारण 50 ते 60 विद्यार्थ्यांना या जेवणातून बाधा झाली आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांना प्रथम तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्रथम उपचार करून त्यांना जास्त त्रास होत असल्याने पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
विद्यार्थ्यांना गणपती भंडाऱ्यात जेवणानंतर विषबाधा –
शिवरे येथील माध्यमिक विद्यालयात आज गणपती विसर्जना निमित्त प्रसाद म्हणून वरण-भात गुलाब जामुन मठची भाजी असे जेवण बनविण्यात आले होते. दरम्यान, ते जेवण विद्यार्थ्यांनी केल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तामसवाडी येथून पारोळा येथे हलविण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहे यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी कुठे रुग्णालयात एकच गर्दी केली होती.
पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार –
विषबाधा झालेल्या सर्व बालकांवर पारोळा कुटीर रुग्णालयातील व शहरातील खाजगी डॉक्टरांनी धाव घेतली व त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत रणाळे, डॉ. निखिल बोहरा, डॉ. कुणाल पाटील, डॉ. सुनील पारोचे, डॉ. चेतन करोडपती, डॉ. भुषण चव्हाण, डॉ. वैशाली नेरकर, डॉ. योगेंद्र पवार, डॉ. सुरेश पाटील, डॉ. गोपाल शिंपी, डॉ. पी. जी. पाटील, डॉ. पुरुषोत्तम पाटील , डॉ. मिलिंद श्राफ, डॉ. महेश पाटील, डॉ महेश पवार, डॉ. गिरीश जोशी, डॉ. महेश पाटील, डॉ. इशान जैन, डॉ. कुलदीप पवार, डॉ. हेमंत मराठे, शहरातील खासगी डॉक्टरांनी उपचार केले.
रुग्णालयात आमदार चिमणराव पाटील, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने, डॉ. संभाजी पाटील, गोविंद शिरोळे, प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड, प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, चंद्रकांत चौधरी, पोलीस निरीक्षक सुनील पवार उपनिरीक्षक राजू जाधव, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, शिवरे पोलीस पाटील तुकाराम पाटील, आदींनी भेट देत विद्यार्थांची विचारपूस केली.
हेही पाहा : Video : पाचोरा-भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांची बहुप्रतिक्षित आणि स्फोटक मुलाखत