जळगाव, 28 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना घडत असताना शहरातून लाचखोरीचे प्रकरण समर आले आहे. शासकीय कंत्राटदाराचे लायसन्स नूतनीकरणासाठी 15 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी एसबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
विद्युत कामे करणाऱ्या परवानाधारक शासकीय कंत्राटदाराचे लायसन्स नूतनीकरणासाठी 15 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव उद्योग, उर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर (52, पार्वती नगर, जळगाव) याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, एसीबीने मंगळवारी सायंकाळी कार्यालयातच त्याला उशिरा अटक केली.
जळगावातील 32 वर्षीय तक्रारदार हे कंत्राटदार असून ते शासनाची विद्युतीकरणाचे कामे घेतात व त्यांच्याकडे त्यासाठीचे लायसन्स आहे. या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी आरोपी सुरळकर याच्याकडे अर्ज केला होता. लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मंगळवारी, 15 हजार रूपयांची लाचेची मागणी करण्यात आली. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली.
दरम्यान, एसीबीचे पोलिस निरीक्षक अमोल वालझाड, एन. एन. जाधव, रविंद्र घुगे, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, प्रदिप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी या पथकाने 15 हजारांची लाच घेताना पकडले. याप्रकरणी गणेश सुराळकर याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
हेही वाचा : शेतकऱ्यांचे अवकाळीने पावसाने नुकसान, पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथे जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी