नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : भारतातील न्यायव्यवस्थेसाठी प्रतिकात्मक असलेल्या न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या स्वरूपात आता मोठा बदल करण्यात आला असून न्यायदेवतेच्या डोळ्यावरील असणारी काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे. तसेच आधी ज्या हाती तलवार होती त्या हाती संविधान असणार आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये न्यायदेवतेचा हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेली न्यायदेवतेचा नवीन पूतळा हा न्याय आंधळा नसतो असा स्पष्ट संदेश देत असल्याचे दिसून येत असून तो संविधानाच्या आधारे काम करतो. असे आणखी पुतळे बसवणार की नाही हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी होती. मात्र, आता ती हटवण्यात आली आहे.
न्यायदेवतेच्या नव्या पुतळ्यातील वैशिष्ट्ये –
- न्यायदेवताचा ह्या संपूर्ण पुतळ्याचा रंग पांढरा आहे.
- पुतळ्यामध्ये न्यायदेवतेचे भारतीय पोशाखात चित्रण करण्यात आले असून त्यामध्ये न्यायदेवता साडीत दाखवलेली आहे.
- डोक्यावर एक सुंदर मुकुट देखील असल्याचे या पुतळ्यात पाहायला मिळते.
- कपाळावर बिंदी, कानात आणि गळ्यात पारंपरिक दागिनेही देखील त्याठिकाणी दिसतात.
- न्यायदेवतेच्या एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात संविधान धरलेले दाखवले आहे.
- खरंतर, न्यायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या न्यायालयांमध्ये ठेवलेल्या पुतळ्याला ‘लेडी जस्टिस’ म्हणून ओळखले जाते.
हेही वाचा : आचारसंहिता म्हणजे काय?, ती लागू झाल्यानंतर नेमकं काय बदल होतात?