ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे बालरंग महोत्सव 2025 अर्थात चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन हा बहारदार कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ, डॉ.राममनोहर लोहिया माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन दगाजी वाघ, शाळेचे चेअरमन जगदीश सोनार, शाळेचे माजी मुख्यध्यापक सिताराम पाटील, संस्थेचे समन्वयक एस. डी. पाटील ,ज्येष्ठ पत्रकार शांताराम चौधरी, पालक प्रतिनिधी गजानन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला साळुंखे यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुख्याध्यापिका उज्वला साळुंखे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली.
कार्यक्रमात राजस्थानी, गुजराथी, पंजाबी, खान्देशी, एज्युकेशन, शेतकरी, साक्षरता, पारंपारिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक, पर्यावरण संतुलन, इत्यादी अनेकविध प्रकारच्या थीम या ठिकाणी सादर करण्यात आल्या. तसेच वैयक्तिक नृत्य, सामुहिक नृत्य, फॅन्सी ड्रेस, यासारख्या अनेकविध कार्यक्रमांची रेलचेल पाहण्यास मिळाली. कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री पाटील, संदीप वाघ, रूपाली साळुंखे आणि प्रवीण कोळी यांनी तर आभार प्रदर्शन दिपक पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाचे अनमोल सहकार्य लाभले.
हेही वाचा – ‘सुवर्ण खान्देश’चे प्रतिनिधी ईसा तडवी यांचा पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान