भामरे (चाळीसगाव), 23 जानेवारी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यीसुद्धा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत आपली चमक दाखवू शकतात, हे चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील विद्यार्थिनी जया पाटील हिने सिद्ध करून दाखवले आहे. चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील कै. जिभाऊ सो.पाडुरंग शामराव पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी कु. जया नितीन पाटील हिने दिल्लीतील राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
भामरे येथील कै. जिभाऊ सो.पाडुरंग शामराव पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी कु. जया नितीन पाटील हिची दिल्लीतील नॅशनल स्कूल गेम्समध्ये कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. दरम्यान, जयाने या राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत स्पर्धेत तिसरे स्थान निश्चित करत कांस्यपदक मिळवले.
तत्पूर्वी, भामरे येथील कै. जिभाऊ सो.पाडुरंग शामराव पाटील विद्यालयाच्या कु.जया पाटील हिच्यासह कुणाल भाईदास मोरे आणि महेश बाळु गायकवाड यांची देखील दिल्लीतील राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेसाठी निवड झाली होती. दरम्यान, चाळीसगाव तालुक्यीतल भामरे या छोट्याशा गावातून जया पाटीलने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हेही वाचा : मी कारसेवक होऊ शकलो नाही मात्र रामसेवक होण्याचे भाग्य मला मिळाले, आमदार किशोर पाटील यांचे प्रतिपादन