पाचोरा, 1 सप्टेंबर : पाचोरा शहरातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक, जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनजी पाटील यांचे निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शांताराम सोनजी पाटील यांनी पाचोरा तालुक्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि उद्योग क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. दरम्यान, आज (1 सप्टेंबर) मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास त्यांनी पुणे येथे अखेरचा श्वास घेतला.
शांताराम सोनजी पाटील यांनी पाचोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून जबाबदाऱ्या पार पाडत स्थानिक राजकारणात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. तसेच एस.एस. पाटील उद्योग समूहाचे संस्थापक व एम एस पी ग्रुपचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांचे पुत्र संजय शांताराम पाटील, प्रदीप शांताराम पाटील आणि मनोज शांताराम पाटील हेसुद्धा राजकीय व सामाजिक क्षेत्रात वडिलांची परंपरा पुढे नेण्याचे कार्य करत आहेत.
आज दुपारी अंत्यसंस्कार –
दरम्यान, शांताराम सोनजी पाटील यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरातील विवेकानंद नगरमधील निर्मल निवास या त्यांच्या राहत्या घरून निघेल. यानंतर पाचोरा येथील अमरधाम येथे त्यांचा अंत्यविधी पार पडेल.
दरम्यान, शांताराम सोनजी पाटील यांच्या निधनानंतर पाचोऱ्यातील एक ज्येष्ठ समाजेवक शहराने गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.