• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

Breaking : ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवकाला एसीबीने लाच घेताना पकडले रंगेहाथ, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 20, 2024
in पारोळा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Breaking : ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवकाला एसीबीने लाच घेताना पकडले रंगेहाथ, नेमकं काय घडलं?

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 20 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना ताज्या असताना पारोळा तालुक्यातून लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. पारोळा तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात 1 लाख रूपयांची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकारीसह कंत्राटी सेवकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, धुळपिंप्री गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 60 लाख रुपये किंमतीची चार विकासकामे मंजूर करण्यात आली होती. यामध्ये काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे या कामांचा समावेश होता. दरम्यान, या कामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी सुनील अमृत पाटील (वय 58) आणि कंत्राटी सेवक कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय 28) यांनी एक लाख 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाचेची केली मागणी –
याप्रकरणात कंत्राटी सेवक बेलदार याने स्वतःसाठी एक टक्का तर ग्रामविस्तार अधिकारी पाटील यांच्यासाठी दोन टक्के लाच मागितली होती. दरम्यान, लाचेची मागणी केल्यानंतर धुळपिंप्री गावातील सरपंचांच्या मुलाने या लाचमागणीची तक्रार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला.

लाचलुचपत विभागाने पकडले रंगेहाथ –
जळगाव लाचलुचपत विभागाने आज 20 सप्टेंबर रोजी पारोळा पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. तडजोडीअंती 1 लाख रुपयांची रक्कम ठरली. दरम्यान, कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने पंचासमोर एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याबरोबर ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील यांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पारोळा तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे.

यांनी केली कारवाई –
या कारवाईचे नेतृत्व जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. त्यांच्या पथकात पोहेकॉ. सुनिल वानखेडे, पोना. किशोर महाजन, पोना. बाळू मराठे यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक नैत्रा जाधव, स्मिता नवघरे, पोहेकॉ. सुरेश पाटील, रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: bribery case parolaparola bribery caseparola taluka latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

September 23, 2026
जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

September 23, 2026
माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

September 23, 2026
पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

September 23, 2026
देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 22, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page