• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home करिअर

शेतकऱ्याचा पोरगा आता अमेरिकेत शिकायला जाणार, बुलढाण्याच्या एकनाथची ‘हार्वर्ड’मध्ये झेप! अत्यंत प्रेरणादायी कहाणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 27, 2025
in करिअर, ताज्या बातम्या, देश-विदेश, महाराष्ट्र
Buldhana farmer son has been admitted to the world-renowned Harvard University to study Public Policy know his inspiring journey

शेतकऱ्याचा पोरगा आता अमेरिकेत शिकायला जाणार, बुलढाण्याच्या एकनाथची ‘हार्वर्ड’मध्ये झेप! अत्यंत प्रेरणादायी कहाणी

बुलढाणा, 27 ऑगस्ट : मेहनत आणि जिद्द असेल तर आयुष्यात व्यक्ती आपली स्वप्न नक्कीच पूर्ण करतो, हे एका शेतकऱ्याच्या मुलाने सिद्ध करुन दाखवले आहे. एकनाथ वाघ असे या तरुणाचे नाव आहे. त्याला जागतिक कीर्तीच्या हार्वर्ड विद्यापीठात ‘पब्लिक पॉलिसी’ शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. त्याचा हा प्रवास साधा नसून संघर्ष, चिकाटी आणि सततच्या परिश्रमाची एक अनोखी गोष्ट आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखला ह्या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला आणि यानंतर त्याची शिक्षणयात्रा एका जिल्हा परिषद शाळेतून सुरू झाली. तेथून त्याने नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला. लहानपणापासून सरकारमार्फत मिळालेल्या मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षणाने त्याच्या ज्ञानाचा पाया रचला. पुढे उच्चशिक्षणासाठी तो पुण्यात आला आणि फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली.

त्यानंतर, एकनाथने देशासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी केली. जरी यश आले नसले तरी, ही तयारी त्याच्या जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली. मग त्याने पुणे विद्यापीठातून शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी (एम.ए.) मिळवली.

अर्थशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या त्याच्या विषयांच्या ज्ञानाचा उपयोग करून देशातील गरीबी व प्रचंड असमानता कमी करणे आणि तळागाळातील लोकांचे जीवन उंचावणे, हे एकनाथचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठीच त्याने हार्वर्डसारख्या विद्यापीठात पब्लिक पॉलिसी शिकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला वाटते की, योग्य धोरणे (पॉलिसी) करूनच समाजातील शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीचे जीवन बदलता येऊ शकते.

मागील तीन वर्षे त्याचा परदेशी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचा संघर्ष चालू होता. पहिल्याच वर्षी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या प्रतिष्ठित विद्यापीठातून त्याला प्रवेश मिळाला होता, पण आर्थिक मदत (स्कॉलरशिप) मिळाली नाही म्हणून तो जाऊ शकला नाही. मागच्या वर्षी हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरही शासकीय स्कॉलरशिपच्या काही तांत्रिक अडचणीमुळे तो जाऊ शकला नाही. परंतु, यावर्षी त्याच्या अथक परिश्रमामुळे आणि निकडीच्या चिकाटीमुळे शेवटी तो हार्वर्डला जात आहे.

याच सुमारास, तो स्वत:च्या तयारीबरोबरच गेली दोन वर्षे ‘एकलव्य संस्थेच्या ग्लोबल स्कॉलर्स’ या कार्यक्रमाशी जोडला गेला आहे. येथे तो दुर्बल घटकातील मुलांना जागतिक विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतो. शिवाय, शासकीय शिष्यवृत्ती धोरणात आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी तो सक्रियपणे पाठपुरावा करतो. विदेशी विद्यापीठांसाठी अर्ज करणाऱ्या आणि शासकीय शिष्यवृत्तीसाठी योग्य असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या बदलांद्वारे मदत मिळावी, यासाठी तो कार्यरत आहे.

ज्या कुटुंबात आई-वडिलांनी कधी शाळेची सावलीसुद्धा पाहिलेली नाही, त्या शेतकरी कुटुंबातून यशाच्या शिखरावर पोहोचणारा एकनाथ वाघ हा आज लाखो ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणा बनला आहे. एकनाथचं यश केवळ त्याचं नसून, त्याच्या आई-वडिलांच्या संघर्षाचंही फळ आहे. ते स्वतः शिकले नाही, पण मुलाला शिकवण्यासाठी सर्व काही केलं.

आज हार्वर्डचा प्रवेश हा या शेतकरी कुटुंबाचा विजय आहे. मनोबल आणि मेहनत असली तरी कोणतेही स्वप्न शक्य आहे, हे एकनाथने सिद्ध करुन दाखवले आहे. त्याचा प्रवास हा महाराष्ट्रातील सर्वच गरीब कुटुंबातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: careereknath waghHarvard Universityinspiring storysuccess

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

October 13, 2025
“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

October 13, 2025
विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

October 13, 2025
तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

October 13, 2025
गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

October 13, 2025
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

October 13, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page