ईसा तडवी, प्रतिनिधी
कुऱ्हाड (पाचोरा) – पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन, तसेच सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यालयात रांगोळी स्पर्धा पार पडली. याचसोबत विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र नॅशनॅलिटी, डोमेशियल आणि जातीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन –
संस्थेच्या सहकार्याने माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून आणि विद्यालयातील शिक्षकांच्या सहकार्याने विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील, केंद्रप्रमुख पटेल सर, माजी विद्यार्थी आणि विद्यालयातील मुख्याध्यापक एस. एम. पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तसेच सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यालयात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन आणि परीक्षण गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील आणि केंद्रप्रमुख पटेल सर यांनी केले. यावेळी त्यांनी परीक्षण करून विद्यार्थिनींना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक निवडले. यानंतर विद्यालयाकडून सदर उत्तीर्ण विद्यार्थी यांना ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
यासोबतच विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र नॅशनॅलिटी डोमेशियल आणि जातीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांना माजी विद्यार्थीही उपस्थित होते होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापकांनी केले. तर सूत्रसंचालन आर. एस. माळी आणि एस. बी. पाटील यांनी केले. यावेळी समाधान पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे महत्त्व पटवून भविष्यातील अडचणीवर मात करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच केंद्रप्रमुख पटेल सर यांनीही महाराष्ट्र शासनाच्या शासकीय नियमांचे महत्त्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विशद केले. या कार्यक्रमाचा समारोप एस. जे. माळी यांनी आभार मानून केला. तर कार्यक्रम संपल्यानंतर सर्व माजी विद्यार्थी मान्यवर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
हेही वाचा – ‘सुवर्ण खान्देश’चे प्रतिनिधी ईसा तडवी यांचा पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान






